

US OPEN 2026 WOMEN'S FINAL
esakal
न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम या टेनिस स्पर्धेमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये पहिल्या दोन क्रमांकावरील खेळाडू एकमेकींसमोर उभ्या असणार आहेत. अव्वल मानांकित अरीना सबलेंका व दुसरी मानांकित एलेना रायबकीना यांच्यामध्ये जेतेपदाची लढाई पाहायला मिळणार आहे.