esakal | US Open: जोकोविचने घेतला बदला, ज्वेरेवचा पराभव करत फायनलमध्ये धडक
sakal

बोलून बातमी शोधा

US Open: जोकोविचने घेतला बदला, ज्वेरेवचा पराभव करत फायनलमध्ये धडक

US Open: जोकोविचने घेतला बदला, ज्वेरेवचा पराभव करत फायनलमध्ये धडक

sakal_logo
By
नामदेव कुंभार

US Open 2021: जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात अॅलेक्जेंडर ज्वेरेव (Alexander Zverev) याचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. नोवाक जोकोविचने 4-6, 6-2, 6-4, 4-6, 6-2 अशा फरकारने अॅलेक्जेंडर ज्वेरेव याचा पराभव केला आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात अॅलेक्जेंडर ज्वेरेववर विजय मिळवत जोकोविचने ऑलम्पिक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला आहे. 2020 ऑल्मपिक स्पर्धेत अॅलेक्जेंडर ज्वेरेव याने जोकेविचचा पराभव केला होता.

वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याच्या इराद्याने नोवाक जोकोविच कोर्टवर उतरला आहे. सर्बियन खेळाडूने अमेरिकन ओपन स्पर्धेची अंति फेरी गाढली आहे. जोकोविच आणि दानिल मेदवेदेव यांच्यामध्ये खिताबी लढत होणार आहे. 20 वेळा ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या जोकोविचने कामगिरीतील सातत्य कायम राखत अमेरिकन ओपन स्पर्धेत धडाकेबाज खेळ करुन दाखवला. अमेरिकन ओपन स्पर्धेवर नाव कोरल्यास जोकोविच याचं 21 वं विजेतेपदक असेल.

टेनिसच्या मैदानात यंदाचे वर्ष जोकोविचसाठी खासच आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन या तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकून कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याची त्याच्याकडे संधी आहे. एकाच वर्षात चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनाही जमलेला नाही. 1969 मध्ये रॉड लीवर यांनी हा कारनामा केला होता. त्यानंतर आतापर्यंत असा पराक्रम कुणालाही करता आलेला नाही. त्यामुळेच जोकोविचच्या कामगिरीकडे टेनिस चाहत्यांचे लक्ष लागून आहे. यापूर्वीच जोकोविचने नदाल आणि फेडरर यांच्या सर्वाधिक 20 वेळा ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

loading image
go to top