Virat Kohli वरून कपिल देव होतोय ट्रोल, उस्मान ख्वाजाने केली कमेंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

usman khawaja trolled kapil devr comment on virat kohli

विराट कोहलीवरून कपिल देव होतोय ट्रोल, उस्मान ख्वाजाने केली कमेंट

Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मवर आता सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बऱ्याच दिवसांपासून मोठ्या खेळीची वाट पाहणाऱ्या विराट कोहलीच्या प्लेइंग-11 मधील जागेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकतेच कपिल देव यांनीही त्यांना टीम इंडियातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता.

कपिल देव यांच्या मते केवळ मोठ्या नावाच्या जोरावर खेळाडू संघात राहू शकत नाहीत, संघात राहण्यासाठी त्यांनी तशी कामगिरीही करायला हवी. कपिल देव यांच्या कमेंटला कर्णधार रोहित शर्माने पण उत्तर दिले. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने सोशल मीडियावर कपिल देव यांची खिल्ली उडवली आहे.(usman khawaja trolled kapil devr comment on virat kohli)

विराट ऐवजी युवा खेळाडूंना संघात आजमावण्याची वेळ आली आहे, असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले होते. ICC ने कपिल देव यांची मुलाखत इंस्टाग्रामवर शेअर केली, ज्यावर उस्मान ख्वाजाने एक कमेंट केली जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आयसीसीच्या या पोस्टवर उस्मान ख्वाजा यांनी कमेंटमध्ये लिहिले, 140 च्या स्ट्राइक रेटवर 50 ची सरासरी ही चांगली गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाने याला सहमत आहे.

विराट कोहलीला गेल्या दोन वर्षांत कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. इंग्लंडविरुद्ध टी-२० फॉरमॅटमध्ये त्याची खराब कामगिरी कायम आहे. त्याला दोन डावात केवळ 12 धावा करता आल्या. आयर्लंड दौऱ्यावर शतक झळकावणाऱ्या दीपक हुड्डालाही त्याच्यामुळेच बाहेर पाठवण्यात आले. याच कारणामुळे कोहलीच्या संघात राहण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

Web Title: Usman Khawaja Trolled Kapil Dev Comment On Virat Kohli On Icc Post Comment Viral Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..