व्हॅलेंटाईन डे बाबत मागितला सल्ला; फोटो शेअर करत कार्तिकचे भन्नाट उत्तर | Valentine Week Dinesh Karthik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valentine Week Dinesh Karthik

Valentine Week Dinesh Karthik : व्हॅलेंटाईन डे बाबत मागितला सल्ला; फोटो शेअर करत कार्तिकचे भन्नाट उत्तर

Valentine Week Dinesh Karthik : जगभरात सध्या व्हॅलेंटाईन वीकचा फिव्हर चढत आहे. लोकं आपल्या प्रीय व्यक्तीसोबत हा आठवडा सेलिब्रेट करण्यासाठी प्लॅनिग करत आहेत. दरम्यान, भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने देखील आपल्या ट्विटर अकाऊंवरून #AskDK Q&A हा कार्यक्रम राबला होता. यावेळी त्याला व्हॅलेंटाईन डे विषयी देखील प्रश्न विचारण्यात आला. त्याला डीकेने आपल्या हटके स्टाईलने उत्तर दिले.

दिनेश कार्तिकने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नसली तरी सध्या भारतीय संघ व्यवस्थापन त्याला संघात घेण्याबाबत उत्सुक नाहीये. दरम्यान, आता दिनेश कार्तिक पुन्हा एकदा समालोचनाकडे वळला आहे. तो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत समालोचन करणार आहे.

रिकाम्या वेळात दिनेश कार्तिकने ट्विटरवर #AskDK हे सत्र चावलतो. यात तो आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. यावेळी एका चाहत्याने त्याला 'सर मला माझ्या प्रीय व्यक्तीसोबत व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी मदत करा असे आवाहन केले.

या प्रश्नावर दिनेश कार्तिकने भन्नाट उत्तर दिले. त्याने एक फोटो शेअर केला. या फोटोत एक व्यक्ती स्वतःलाच आरशात पाहते असतो.

दिनेश कार्तिकने प्रश्न उत्तरांच्या या सत्रात तो बॉर्डर गावसकर ट्रॉफीत समालोचन करणार असल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली. यावेळी कार्तिकला तू ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत पदार्पण करणार आहेस याबाबत तुझ्या भावना काय आहेत असे विचारले. यावर कार्तिकने त्याचा याआधी समालोचन करतानाचा फोटो शेअर करत मी यापूर्वीही समालोचन केले असल्याचे सुचित केले.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली