Pune Chess: वीरेश, श्लोक, हितांश, सोहमचा सलग विजय; शालेय बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीत दमदार कामगिरी
Chess Champions: पुण्यातील सतरा वर्षांखालील मुलांच्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेत वीरेश, श्लोक, हितांश यांनी पाचव्या फेरीत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. विठोबा मारुती पठारे क्रीडा संकुलात स्पर्धा रंगतदार होत आहे.
पुणे : शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित सतरा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत वीरेश शरणार्थी, श्लोक शरणार्थी, हितांश जैन, सोहम जठारने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविले.