'आयपीएल' गाजवणाऱ्या विदर्भपुत्राचे अकोल्यात जल्लोषात स्वागत, 'या' संघाचे केले प्रतिनिधीत्व

Atharv Taide
Atharv Taide

अकोला : अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा सलामीला खेळणारा डावखुरा शैलीदार फलंदाज अथर्व तायडे दोन वर्षांपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघाचे प्रतिधित्व करीत आहे. यावर्षी अथर्वने आयपीएल स्पर्धेत दोन सामन्यात अर्धशतकीय खेळी करून स्पर्धा गाजविली.

Atharv Taide
JioCinema Records: Jio सिनेमाने डिजिटल व्ह्यूअरशिपचे मोडले सर्व रेकॉर्ड! इतक्या कोटी लोकांनी पाहिला सामना

स्पर्धेत विदर्भाकडून अर्धशतकीय खेळी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या या यशस्वी कामगिरीनंतर अकोल्यात दाखल होताच अकोला क्रिकेट क्लबचे पदाधिकारी व खेळाडूंना त्याचे जोरदार स्वागत केले. संघाकडून केले आहे. रणजी ट्रॉफी व इराणी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

२३ मे रोजी सायंकाळी अथर्वचे अकोला क्रिकेट क्लबवर जोरदार स्वागत करण्यात आले. अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल व सचिव विजय देशमुख यांच्या हस्ते अथर्वचा सत्कार करण्यात आला.

यावेळी क्लबचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, माजी अध्यक्ष विजय तोष्णीवाल तथा क्लबचे कर्णधार भरत डिक्कर व क्लबचे सर्व सन्मानीय सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे ता. २४ मे सकाळी अथर्व तायडे याने अकोला क्रिकेट क्लबवर सुरू असणाऱ्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरातील खेळाडूना खेळातील सातत्य, चिकाटी, मेहनत व आत्मविश्वासाने खेळात उंच भरारी घेता येते याबाबत मार्गदर्शन केले.

Atharv Taide
ज्या ताटात खाल्लं त्याच..! पाळलेल्या वाघाला खाऊ घालायला गेला अन् घात झाला; तिथेच बनली कबर

यावेळी सर्व खेळाडूतर्फे अथर्वचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे संयोजक भरत डिक्कर, व्ही.सी.ए.चे प्रशिक्षक राहुल चिखलकर, विजय चव्हाण, क्लबचे मुख्ये प्रशिक्षक सुमेद डोंगरे, प्रशिक्षक बंटी क्षीरसागर, किशोर धाबेकर, अभिजित करणे, एस. टी. देशपांडे रेल्वे खेळाडू पवन परनाटे, खेळाडू व पालकांची उपस्थिती होती. यावेळ आयपीएल स्पर्धेत आरसीबी संघाचा आर्म थोर्बर बॉलर म्हणून यश शिरसाट याचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

गेल्या १० वर्षांपासून क्लबच्या खेळाडूंनी अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नाव राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावर नेले असून, ही बाब अकोला क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंकरिता प्रेरणादायी तसेच आत्मविश्वासात भर टाकणारी आहे. जिल्ह्यातील उदोन्मुख खेळाडूंचा खेळण्याचा स्तर उंचावला असून, मोठे स्वप्न घेऊन आत्मिवश्वासाने मैदानात उतरत आहेत, अशी माहिती अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com