सिक्सर मारेन अन् बघणारही नाही.... फ्लेचरचा No Look SIX पाहाच

Andre-Fletcher-Six
Andre-Fletcher-Six

तुम्ही पाहिलात का व्हायरल झालेला VIDEO

कॅरेबियन प्रिमियर लीग (CPL) स्पर्धेत सेंट ल्युसिया किंग्स (St Lucia Kings) आणि त्रिनबॅगो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) या दोन संघांमध्ये अटीतटीचा (Tough Fight) सामना रंगला. किंग्सने रायडर्स संघाचा ५ धावांनी पराभव केला. सेंट ल्युसिया किंग्स संघाने २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाला ३ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला (Last Ball Thriller) खेळ अखेर किंग्स संघाने जिंकला. पण त्यांच्या विजयापेक्षाही चर्चेत राहिला तो आंद्रे फ्लेचरचा No Look SIX!!

Andre-Fletcher-Six
"हे विसरू नका की याच टीम इंडियाने...", हुसेनचा इंग्लंडला इशारा

किंग्स संघाची फलंदाजी सुरू होती. फ्लेचर आणि रहकीम कॉर्नवॉल ही सलामी जोडी खेळत होती. या दरम्यान पाचव्या षटकात पाचव्या चेंडूवर आंद्रे फ्लेचर फलंदाजीत करत होता. किंग्स संघाचा स्कोअर बिनबाद ३८ होता. त्यावेळी फ्लेचरने त्याचा लोकप्रिय असलेला नो लूक सिक्सर मारला आणि वाहवा मिळवली. रायडर्स संघाचा इसुरू उदाना याला त्याने उत्तुंग असा षटकार लगावला.

दरम्यान, किंग्स संघाकडून फ्लेचरने ३ षटकार खेचत २८ धावा केल्या. टीम डेव्हिडने ३ चौकार आणि ३ षटकार लगावत सर्वाधिक ४३ धावा कुटल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर किंग्स संघाने १५७ धावांचा पल्ला गाठला. या आव्हानाचा पाठलाग करताना रायडर्स संघाचा अंदाज चुकला. जोखीम न घेण्याच्या नादात त्यांच्या सलामीच्या फलंदाजांनी धावगती कमी राखली. सिमन्सने ३० चेंडूत २५ तर वेबस्टरने १७ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर कॉलीन मुनरोने ४७ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. पोलार्ड ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर मुनरोला साथ देणाऱ्या टीम सिफर्टने १६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार मारून नाबाद ४० धावा कुटल्या. पण आधीच्या फलंदाजांच्या संथी खेळीमुळे त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यांना ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com