esakal | VIDEO: क्रिकेट सामन्यात तुफान राडा; बॅट अन् लाथेने हाणामारी
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket-Fight-Video

VIDEO: क्रिकेट सामन्यात तुफान राडा; बॅट अन् लाथेने हाणामारी

sakal_logo
By
विराज भागवत

सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय

क्रिकेट म्हणजे सज्जन लोकांचा खेळ (Gentleman's Game) असं म्हटलं जातं. हा खेळ संयमाचा आणि शिस्तीचा आहे. पण अनेक वेळा काही नियमांचे उल्लंघन केले जाते. दोन खेळाडू किंवा संघ आमनेसामने आले तर थोडी फार तू तू मै मै होते. दोन संघ एकमेकांविरूद्ध खेळतात त्यामुळे काही वेळा मैदानात वादही घातले जातात. पण या साऱ्याला एक मर्यादा असते. या साऱ्या मर्यांदा सोडून पाकिस्तानमध्ये एका क्रिकेट सामन्यात चक्क बॅटने आणि लाथाबुक्क्यांनी दोन संघातील खेळाडूंनी एकमेकांना हाणामारी केल्याचे दिसून आले. (Video of Massive Fight on Cricket Ground Players beat each others with bats stumps kicks punches massive brawl erupted watch)

हेही वाचा: IND vs SL: 'ते' पाहून द्रविड ड्रेसिंग रूममधून खाली आला अन्...

काही दिवसांपूर्वीच क्रिकेटला गालबोट लावणारी घटना घडली. त्या घटनेने क्रिकेटविश्वाला हादरवून टाकले. रविवारी (१८ जुलै) युकेच्या मेडस्टोनमधील मोट पार्क क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेट सामना सुरू होता. निधी गोळा करण्याच्या दृष्टीने मैत्रिपूर्ण स्वरूपाचा असा हा सामना खेळला जात होता. सामन्याच्या शेवटच्या क्षणी एक वाद घडला आणि फारच टोकाला गेला. सामन्याच्या निर्णायक वेळेत दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना बॅटने, लाथांनी, बुक्क्यांनी, स्टंपने बेदम हाणामारी केली.

पाहा व्हिडीओ-

क्रिकेटच्या मैदानावरचा हा राडा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला. सध्या हा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अगोदर काही खेळाडूंमध्ये वाद चालू असलेला दिसून येतोय. त्यानंतर एक खेळाडू बॅट घेऊन पळत येतो आणि विरोधी संघाच्या खेळाडूला मारायला सुरुवात करतो. या खेळाडूंचे वाद सोडवण्यासाठी काही लोक मध्ये येताना व्हिडीओत दिसतात पण तरीही हे खेळाडू काही शांत होत नाहीत. या खेळाडूंचे असं विचित्र कृत्य साऱ्यांना वाईट वाटवं असंच होतं. हे क्रिकेटविश्वाला लाजवणारं आहे अशी भावना नेटिझन्सने व्यक्त केली. तसेच, कोणताही क्रिकेटप्रेमी हा व्हिडिओ पाहून नाराजच होईल, असेही काहींना ट्वीट केले.

loading image