सलग चौथ्या सुवर्णपदकाच्या विनेशच्या अपेक्षांना हादरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

विनेश फोगटला मेदवेदेव कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकतर्फी हार पत्करावी लागली. त्यामुळे जागतिक स्पर्धेपूर्वी सलग चार स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या तिच्या अपेक्षांना हादरा बसला.

मुंबई ः विनेश फोगटला मेदवेदेव कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकतर्फी हार पत्करावी लागली. त्यामुळे जागतिक स्पर्धेपूर्वी सलग चार स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या तिच्या अपेक्षांना हादरा बसला.

विनेश उपांत्य फेरीची लढत 11-0 अशी जिंकून अपेक्षा उंचावल्या होत्या; पण तिला 53 किलो गटाच्या अंतिम फेरीत एकतर्फी हार स्वीकारावी लागली. विनेशला एन. मॅलिशेवविरुद्ध 0-10 अशा पराभवास सामोरे जावे लागले.

विनेशसाठी ही हार धक्कादायक होती. ती रशियाच्या मॅलिशेवला हरवेल, असा कयास होता. मॅलिशेवपेक्षा ऊपांत्य फेरीतील विनेशचा विजय जास्त सफाईदार होता; पण विनेशचे स्वप्न अपूर्णच राहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinesh phogat lost in the final

टॅग्स