कोहलीने T20 कर्णधार म्हणून केलेले 5 'विराट' विक्रम

Virat-Kohli-T20
Virat-Kohli-T20
Summary

विराट कोहलीने कर्णधार असताना केली धडाकेबाज कामगिरी

Virat Kohli Stepping Down as T20 Captain: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरूवारी मोठी घोषणा केली. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराटने टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१नंतर भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून, विराट कर्णधारपद सोडणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर आज विराटने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.

Virat-Kohli-T20
Breaking: विराटने सोडलं कर्णधारपद; ट्विटरवरून केली घोषणा

विराटचे T20 क्रिकेटमधील पाच खास विक्रम

१. टी२० क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा कर्णधार आहे. विराटच्या नावे टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १,४२१ धावा असून जगातील टी२० कर्णधारांमध्ये तो चौथा आहे.

२. भारताच्या टी२० क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांच्या यादीत विराट कोहलीचा दुसरा क्रमांक लागतो. विराटने आतापर्यंत भारताला २७ विजय मिळवून दिले आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ४२ विजयांसह यादील अव्वल आहे.

३. टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने अवघ्या ३० डावांमध्ये हा मैलाचा दगड ओलांडला होता. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस ३१ डावांसह दुसरा आहे.

virat kohli
virat kohligoogle
Virat-Kohli-T20
पाकचा माजी क्रिकेटर म्हणतो, विराट विरोधात 'डर्टी गेम'

४. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या SENA देशांमध्ये टी२० मालिका जिंकणारा विराट कोहली हा एकमेवर कर्णधार आहे. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली २०१८मध्ये इंग्लंडला २-१ने, दक्षिण आफ्रिकेला २-१ने, २०२०मध्ये न्यूझीलंडला ५-०ने आणि ऑस्ट्रेलियाला २-१ने पराभूत केले.

५. विराट कोहली हा टी२० क्रिकेटच्या इतिहासात विजयांच्या बाबतीत कर्णधारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत अफगाणिस्तानचा असगर अफगाण, भारताचा महेंद्रसिंग धोनी आणि इंग्लंडचा इयॉन मॉर्गन हे विराटच्या पुढे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com