esakal | INSvsWI : विराट, अजिंक्यचे अर्धशतक; भारताकडे मजबूत आघाडी
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli, Ajinkya Rahane

जडेजाच्या अर्धशतकामुळे भारताने 297 धावा केल्या होत्या, तर इशांतच्या पाच, शमी आणि जडेच्या दोन विकेटमुळे भारताने विंडीजला 222 धावांवर रोखले होते. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला.

INSvsWI : विराट, अजिंक्यचे अर्धशतक; भारताकडे मजबूत आघाडी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नॉर्थ साउंड (अँटिग्वा) : कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकामुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मजबूत आघाडी घेतली असून, तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात 3 बाद 185 धावा करत 260 धावांची आघाडी घेतली आहे.

जडेजाच्या अर्धशतकामुळे भारताने 297 धावा केल्या होत्या, तर इशांतच्या पाच, शमी आणि जडेच्या दोन विकेटमुळे भारताने विंडीजला 222 धावांवर रोखले होते. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला.

पहिल्या डावात अपयशी ठरलेला मयांक अगरवाल दुसऱ्या डावात थोडासा स्थिरावलेला दिसला. मात्र, मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. 16 धावांवर बाद झाल्यानंतर पुजारा आणि राहुलने काही काळ डाव सावरला. पण, राहुल पुन्हा एकदा चेसचा बळी ठरला. राहुल 38 धावा करून बाद झाला. त्याला दुसऱ्या डावातही अर्धशतक पूर्ण करण्यात अपयश आले. तर, पुजारा 25 धावांवर बाद झाला. 

त्यानंतर विराट आणि रहाणे यांनी भारताची आणखी पडझड न होऊ देता दिवसअखेरपर्यंत फलंदाजी केली. या दोघांनीही अर्धशतके साजरी केली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विराट 51 आणि रहाणे 53 धावांवर खेळत होते.

loading image
go to top