Suzuki Access 125 वर अनुष्का सोबत विराट कोहली रस्त्यावर, जाणून घ्या स्कूटरची किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

virat kohli and anushka sharma Suzuki Access 125 price

Suzuki Access 125 वर अनुष्का सोबत विराट कोहली रस्त्यावर, जाणून घ्या स्कूटरची किंमत

Virat Kohli and Anushka Sharma Suzuki Access 125 Price : क्रिकेटपटू बहुतेकदा त्यांच्या सुपरबाइक किंवा लक्झरी कारमध्ये मैदानाबाहेर दिसतात. दरम्यान विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील रस्त्यावर स्कूटरवर राईडचा आनंद घेताना दिसले. कोहली आणि अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का सुझुकी एक्सेस 125 स्कूटीवर फिरताना दिसत आहे.

हेही वाचा: Yuzvendra Chahal Wife : धनश्री वर्माने युझवेंद्र चहलसोबतच्या नात्यावर तोडले मौन; 'मी शस्त्रक्रिया...'

कोहली आणि अनुष्का मुंबईत स्कूटरवरून फिरताना दिसले. दोघांनी काळ्या रंगाचे हेल्मेट घातले होते. ज्यामुळे त्यांची ओळख गुप्त ठेवताना योग्य सुरक्षा उपायांची खात्री होते. Suzuki Access 125 बद्दल बोलायचे झाले तर, या स्कूटरची सुरुवातीची किंमत 76,600 रुपये पासून सुरू होते जी टॉप वेरिएंटमध्ये जाताना 86,200 रुपयांपर्यंत जाते.

Access 125

Access 125

सुझुकी ऍक्सेस 125 ही 125 सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये भारतीय जनतेमध्ये लोकप्रिय निवड आहे. हिरोचा ब्रँड अॅम्बेसेडर असूनही, विराट कोहलीने Hero Maestro Edge 125 पेक्षा Access 125 ची निवड केली. पावसाळ्यातही ही स्कूटर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. आशिया चषकात विराट कोहली खेळताणा दिसणार आहे. 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही. अशा परिस्थितीत किंग कोहली या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये परतण्यास इच्छुक आहे.

Web Title: Virat Kohli And Anushka Sharma Suzuki Access 125 Price Scooter Mumbai Ride Video Goes Viral Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..