Smriti Mandhana: RCBची मोठी घोषणा! स्मृती मंधानाकडे सोपवली कर्णधाराची जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Virat Kohli announce Smriti Mandhana as captain RCB women’s team for WPL 2023 cricket news in marathi kgm00

Smriti Mandhana: RCBची मोठी घोषणा! स्मृती मंधानाकडे सोपवली कर्णधाराची जबाबदारी

WPL 2023 Smriti Mandhana Captain RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी स्मृती मंधानाची महिला प्रीमियर लीगसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस डब्ल्यूपीएलसाठी आरसीबीच्या कर्णधारपदाची घोषणा केली. भारताची स्टार महिला खेळाडू स्मृती मानधानाला बंगळुरुच्या संघासाठी तिला तब्बल 3.40 कोटींची बोली लागली.

महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलमध्ये माजी महिला क्रिकेटपटूंवर खूप लक्ष दिले जात आहे. माजी कर्णधार मिताली राजची गुजराज जायंट्स संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर झुलन गोस्वामी ही मुंबई इंडियन्सची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

स्मृती मंधानाची आरसीबीच्या कर्णधारपदी नियुक्ती करताना, फ्रँचायझीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा म्हणाले, 'आमची धाडसी स्मृती. आम्ही तिच्याकडे नेतृत्वाची भूमिका सोपवली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की स्मृती आरसीबीला नवीन उंचीवर घेऊन जाईल.

BCCI ने WPL चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स हे पाच संघ भाग घेतील. सर्व सामने मुंबईतील दोन मैदानांवर होणार आहेत. डीवाय पाटील स्टेडियमवर 4 मार्चपासून लीग सुरू होणार आहे. गुजरात आणि मुंबई पहिल्या सामन्यात भिडतील. त्याच वेळी अंतिम सामना 26 मार्च रोजी होणार आहे, जो ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

WPLच्या पहिल्या सत्रात एकूण 20 लीग सामने आणि 2 प्लेऑफ सामने होणार आहे, जे 23 दिवसांच्या कालावधीत खेळल्या जातील. या स्पर्धेत चार डबल हेडर असतील. पहिला डबलहेडर 5 मार्च, दुसरा 18 मार्च, तिसरा 20 मार्च आणि चौथा 21 मार्च रोजी होणार आहे.

ज्या दिवशी दुहेरी हेडर असेल, त्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. त्याचवेळी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून इतर सामने होतील. WPL 2023 चा एलिमिनेटर सामना 24 मार्च रोजी DY पाटील स्टेडियमवर खेळल्या जाईल.