कोरोनाग्रस्तांसाठी विराट-अनुष्का 7 दिवसांत 11 कोटी जमा करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

virat kohli and anushka sharma

कोरोनाग्रस्तांसाठी विराट-अनुष्का 7 दिवसांत 11 कोटी जमा करणार

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे स्विट कपल कोरोनाग्रस्तांसाठी एकत्रितपणे काम करत आहेत. देशातील 3 लाखहून अधिक लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Virat Kohli- Anushka Sharma) यांनी मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत दोघांनी 11 कोटी इतकी रक्कम जमा केलीये.

हेही वाचा: कोरोनाच्या लढ्यासाठी 'विरुष्का' मैदानात

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने या मोहिमेच्या माध्यमातून 7 कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. अपेक्षित मदतीपेक्षा अधिक रक्कम या मोहिमेतून जमा झाली आहे. या जोडीने 2 कोटी रुपये जमा करत या मोहिमेला सुरुवात केली होती.

हेही वाचा: IPL स्पर्धेत संघ तळाला, पण माणुसकीत टॉपला!

ketto नावाच्या मोहिमेमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने पुढाकार घेतला होता. यात विराट कोहली मदतीला आहे, असेही तिने सांगितले होते. या दोघांनी संकटात अडकलेल्या आपल्या देशवासियांसाठी मदतीला पुढे येण्याचे आव्हान केले होते. एमपीएल स्पोर्ट्स फाउंडेशनने 5 कोटींची मदत दिली. विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून या फाउंडेशनचे आभार मानले आहेत. कोरोना विरोधातील लढ्यात 5 कोटींची मदत दिल्याबद्दल धन्यवाद! असे ट्विट विराट कोहलीने केले आहे. 7 कोटींचे लक्ष्य आता 11 कोटी करत आहोत, असेही या जोडीने म्हटले आहे. 7 दिवसांत ही मदत जमा करण्यात येणार आहे. मोहिमेच्या अंतर्गत जमा होणारी रक्कम ही देशातील कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन खरेदीसह अन्य आरोग्यविषयक साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे.

Web Title: Virat Kohli Anushka Sharma Collects 11 Crore For Fight Against Covid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top