Virat Kohli : हैदराबाद की अयोध्या...; विराट कोहली आता आहे तरी कुठे? व्हिडिओ होतोय व्हायरल

India vs England Series 2024 News :
virat kohli ram mandir News Marathi
virat kohli ram mandir News Marathi

India vs England Series 2024 : अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकासाठी आता फक्त एक दिवस राहिला आहे. या कार्यक्रमात ऋषी-मुनींसोबतच देशभरातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत. महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले आहे.

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पण विराट कोहली अयोध्यात जाणार की नाही यावर सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी विराट हैदराबादला पोहोचला आहे.

virat kohli ram mandir News Marathi
Prithvi Shaw : पृथ्वी शॉच्या पुनरागमनावर टांगती तलवार! दुखापतीतून सावरण्यासाठी लागणार वेळ

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विराट कोहली अयोध्येला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र तो हैदराबादला आला आहे. भारतीय संघाला 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. पाच सामन्यांची ही कसोटी मालिका 11 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहली हैदराबाद विमानतळावर दिसत आहे. हैदराबादमध्ये 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीने आधीच तयारी सुरू केली आहे.

virat kohli ram mandir News Marathi
Video : पठ्ठ्याने इंग्लिश गोलंदाजांना तुडव तुडव तुडवले! शतक ठोकत मैदानातून सोडला 'बाण', भरतचे जय श्रीराम

पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com