Happy Birthday Virat Kohli : सचिन तेंडुलकरचे हे 4 मोठे विक्रम 'किंग कोहली'ने मोडले

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला आपल्याकडून ३४ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!...
 Happy Birthday Virat Kohli
Happy Birthday Virat Kohlisakal

Happy Birthday Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये सुमारे 145 च्या स्ट्राइक रेटने 220 धावा केल्या आहेत. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

किंग कोहलीला सचिन तेंडुलकर सोबत भारताचा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते. मास्टर ब्लास्टरने 200 कसोटी, 463 एकदिवसीय मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने तीन फॉरमॅटमध्ये एकूण 34,357 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 113 T20I डावात एकूण 24,350 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

 Happy Birthday Virat Kohli
Roger Binny: पाकिस्तान दौऱ्याबाबत BCCI अध्यक्ष यांची मोठे वक्तव्य, आफ्रिदीला ही दिले सडेतोड उत्तर

सर्वात वेगवान 24,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज -

कोहलीने सप्टेंबरमध्ये आशिया कप 2022 सुपर-4 सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत नाबाद 122 धावा करून शतकासह 1000 दिवसांहून अधिक धावांचा दुष्काळ मोडला. 12 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश असलेल्या त्याच्या या शानदार खेळीदरम्यान कोहलीने तेंडुलकरचा सर्वात वेगवान 24,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज बनण्याचा विक्रम मागे टाकला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 12,000 धावा

भारताच्या 2020-21 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 12,000 धावा करणारा फलंदाज ठरला. कोहलीने त्याच्या 242 व्या डावात 12,000 एकदिवसीय धावा केल्या, तर तेंडुलकरला तिथे पोहोचण्यासाठी 300 डाव लागलं होतं. सचिननंतर रिकी पाँटिंग (314), कुमार संगकारा (336) आणि सनथ जयसूर्या (379) यांची नावे येतात.

 Happy Birthday Virat Kohli
ENG vs SL : इंग्लंडच्या मार्गात श्रीलंकेचा अडथळा! उपांत्य फेरीत कोण जाणार?

व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा जास्त स्कोअर

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होता. कोहलीने या सामन्यात 53 चेंडूत नाबाद 82 धावांची शानदार खेळी करताना तेंडुलकरला मागे टाकले. आयसीसीम टूर्नामेंट व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये सर्वोच्च पन्नास अधिक धावसंख्या ठरली. दोन्ही दिग्गजांचा ICC मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये 23-23 पन्नास अधिक धावा होत्या. बाबर आझम अँड कंपनीविरुद्ध संस्मरणीय कामगिरीसह कोहलीने आपले 24 वे अर्धशतक पूर्ण केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विदेशात सर्वाधिक धावा

टीम इंडियाच्या T20 विश्वचषक 2022 च्या अॅडलेडमधील सुपर-12 सामन्यात विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध 44 चेंडूत नाबाद 64 धावा करताना सचिनला मागे टाकून विदेशात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. भारतीय बॅट्समनने आता ऑस्ट्रेलियामध्ये सर्व फॉरमॅटमध्ये 3350 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. त्याचवेळी सचिनने 3300 आंतरराष्ट्रीय धावा करत ऑस्ट्रेलियातील कारकिर्दीचा शेवट केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com