esakal | WTC: कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम; धोनीला टाकले मागे
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni And Virat Kohli

WTC: कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम; धोनीला टाकले मागे

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात टॉसला मैदानात पाउल ठेवताच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नवा विक्रम आपल्या नावे केला. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या महेंद्र सिंह धोनीचा विक्रम त्याने मागे टाकला. विराट कोहली 61 व्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. महेंद्र सिंह धोनीने 60 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. या यादीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली दुसऱ्या स्थानावर आहेत. सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 49 कसोटी सामने खेळले आहेत. माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी प्रत्येकी 47-47 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. (Virat Kohli breaks MS Dhonis captaincy record as India name team for World Test Championship final against New Zealand)

सर्वाधिक कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याचा जागतिक विक्रम हा ग्रॅहम स्मिथ यांच्या नावे आहे. त्याने 109 कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीमने 53 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 29 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. 27 सामने अनिर्णत राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज एलन बॉर्डर (93), न्यूझीलंडचा स्टिफन फ्लेमिंग (80), ऑस्ट्रेलियन रिकी पॉटिंग (77), वेस्ट इंडिजचे दिग्गज क्लाइव लॉयड (74) यांच्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो.

हेही वाचा: WTC Final : टीम इंडियाने मिल्खा सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 36 कसोटी सामन्यात विजय नोंदवला असून 14 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. त्याच्या नेतृत्वाखाली 10 कसोटी सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे. विनिंग पर्सेंटेजमध्ये रिकी पॉटिंग कोहलीच्या पुढे आहे. त्याच्या पेक्षा अधिक सामन्यात संघाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियन कर्णधाराने 62.33 टक्के इतके विनिंग पर्सेंटेज आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे विनिंग पर्सेंटेज 59.01 टक्के इतका आहे.

हेही वाचा: WTC Final 2021 : संजना-बुमराहच्या मुलाखतीवर कमेंटची 'बरसात'

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी उत्तम असली तरी आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीची पाटी कोरीच आहे. 2017 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायलन गाठली. पण यावेळी संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडमध्ये झालेल्या वल्डकप स्पर्धेतही न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला आउट केले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकून विराटला आयसीसी स्पर्धेतील दुष्काळ संपवण्याची संधी आहे.

loading image