INDvsWI : गांगुलीला मागे टाकत कोहली ठरला 'दादा'

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमधील भारताचा हा परदेशातील 12वा विजय आहे. याच विजयासह कर्णधार विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम मोडला आहे.

अॅंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमधील भारताचा हा परदेशातील 12वा विजय आहे. याच विजयासह कर्णधार विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम मोडला आहे.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात 11 सामने जिंकले आहेत. कोहलीने विंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर हा विक्रम मोडला. गांगुलीला हा विक्रम करण्यासाठी 28 सामने लागले तर कोहलीने हा विक्रम 26 सामन्यांमध्ये मोडला. 

तसेच भारताचा कर्णधार म्हणून त्याचा हा 27वा विजय होता. याच विजयासह त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. धोनीच्या नावावर 60 सामन्यांमध्ये 27 विजय आहेत तर कोहलीने ही कामगिरी 47 सामन्यांमध्ये केली. 

भारतीय कर्णधार म्हणून कसोटीमध्ये परदेशात सर्वाधिक विजय 

विराट कोहली : 12 (26)
सौरभ गांगुली : 11 (28)
एमएस धोनी : 06 (30)
राहुल द्रविड : 05 (17)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli breaks record of Sourav Ganguly of most away test wins as an Indian captain