
आता बस झालं विराट परत ये; प्रशिक्षक शर्मांनी कोहलीला दटावले
नवी दिल्ली: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपला शतकांचा दुष्टाळ संपवून 196 धावांची झुंजार खेळी केली. मात्र इकडे विराट कोहलीची (Virat Kohli) गाडी काही शतक पार करताना दिसत नाही. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत देखील 71 व्या शतकाची संधी दवडली. विराट कोहली 40 - 50 धावांपर्यंत पोहोचतो मात्र त्याचे शतकात रूपांतर होत नाहीये. दरम्यान, विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक (Virat Kohli Childhood Coach) राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी विराट कोहलीला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: रोहित विराटपेक्षाही चांगला कसोटी कर्णधार होऊ शकतो : वासिम जाफर
राजकुमार शर्मा म्हणाले की, मी विराट कोहलीला त्याचा फॉर्म (Virat Kohli Batting Form) परत मिळवण्यासाठी मदत करू इच्छितो. विराट कोहलीला त्याच्या बेसिक्सवर परत यावे लागेल. मला नक्कीच वाटते की त्याने अकॅडमीत परतावे. मी कालपासून याबाबत विचार करत होतो. मी त्याच्याशी बोलणार आहे.विराटला जो आत्मविश्वास अकॅडमीत फलंदाजी करताना मिळत होता त्याची त्याला पुन्हा गरज आहे.'
विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार पुढे म्हणाले, खरं म्हणजे तो चांगली फलंदाजी करत आहे. मात्र दुर्दैवाने तो फारच सावधरित्या फलंदाजी करत आहे. जर त्याने कारकिर्दिच्या सुरूवातीला करत होता तशी अजून मोकळ्या पद्धतीने फलंदाजी करायला सुरूवात केली तर तो चांगल्या फॉर्ममध्ये येऊ शकतो. अशा खेळपट्ट्यांवर तुम्हाला ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सारखे मिळणाऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याची गरज आहे.
हेही वाचा: घरात मुलं झोपली असतानाच त्यांनी... पोग्बाने सांगितला तो भयानक अनुभव
विराट कोहलीसाठी श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका फारशी चांगली गेली नव्हती. या मालिकेनंतर पहिल्यांदाच विराट कोहीलची सरासरी 50 च्या आत आली आहे. विराट कोहलीची सरासरी आता 49.95 इतकी आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 101 कसोटी सामन्यात 28 अर्धशतके आणि 27 शतके ठोकत 8043 धावा केल्या आहेत.
Web Title: Virat Kohli Childhood Coach Rajkumar Sharma Says Virat Should Return Academy For Regain Batting Form
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..