esakal | INDvsWI : हे स्पेशल युनिट आहे आणि याचा मला अभिमान आहे : विराट 
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli congratulates team India after winning test series against West Indies

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिली मालिका जिंकल्याचा खूप आनंद आहे. संघाने प्रत्येक आघाडीवर सर्वोत्तम कामगिरी केली आहे. हा भारतीय संघ हा स्पेशल युनिट आहे आणि या स्पेशल युनिटचा मला खूप अभिमान आहे

INDvsWI : हे स्पेशल युनिट आहे आणि याचा मला अभिमान आहे : विराट 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारताने विंडीजला व्हाईटवॉश दिला. भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी विंडीजला 257 धावांनी हरविले. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाचे वर्णन स्पेशल युनिट असे केले आहे. तर या स्पेशल युनिटचा मला खूप अभिमान आहे असेही त्याने म्हटले आहे. 

''जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिली मालिका जिंकल्याचा खूप आनंद आहे. संघाने प्रत्येक आघाडीवर सर्वोत्तम कामगिरी केली आहे. हा भारतीय संघ हा स्पेशल युनिट आहे आणि या स्पेशल युनिटचा मला खूप अभिमान आहे,'' अशा शब्दांत त्याने भारतीय संघातील त्याच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. 

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 468 धावांच्या आव्हानासमोर विंडीजचा दुसरा डाव 210 धावांत आटोपला. भारताचे सलग दुसऱ्या विजयासह 120 गुण झाले.  मालिकेतील 2-0 अशा धवल यशासह भारताने जागतिक कसोटी मालिकेत निर्विवाद आघाडी घेतली आहे. 

loading image
go to top