
On This Day 2008 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 14 वर्षांपूर्वी या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या 14 वर्षांच्या प्रवासाची आठवण करून देत कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कोहलीने काही जुने फोटो जे चाहत्यांना जुन्या क्षणांची आठवण करून देत आहेत. या पोस्टसह त्यांनी लिहिले 14 वर्षांपूर्वी, हे सर्व सुरू झाले आणि हा एक सन्मान आहे.
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 ऑगस्ट 2008 ला पदार्पण केले. कोहलीने 12 जून 2010 रोजी पहिला टी20 तर 20 जून 2011 रोजी पहिला कसोटी सामना खेळला. कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 शतकांसह 12344 धावा आहेत. त्याच वेळी त्याने टी-20 आणि कसोटीमध्ये अनुक्रमे 3308 आणि 8074 धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध कोहलीने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीत किंग कोहली, रन मशीन, चेस मास्टर अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा कोहली आपल्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. त्यादरम्यान त्याला 22 चेंडूत केवळ 12 धावा करता आल्या.
कोहली सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. त्याला जवळपास अडीच वर्षांहून अधिक काळ शतकही झळकावता आले नाही. कोहली सध्या 20-30 धावांचा टप्पा गाठण्यासाठी धडपडताना दिसत आहे. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता डे-नाईट कसोटीत शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.