Virat Kohli : विराटनं भन्नाट कॅच घेत केला मोठा विक्रम; वर्ल्डकपमधील पहिलीच विकेट ठरली खास

Virat Kohli
Virat KohliESAKAL
Updated on

Virat Kohli : वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताचा वेगवान गोलंदज जसप्रीत बुमराने सलामीवीर शॉन मार्शला शुन्यावर बाद करत मोठा धक्का दिला.

या विकेटमध्ये बुमराहसोबतच विराट कोहलीचा देखील मोठा वाटा आहे. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने डाईव्ह मारत भन्नाट झेेल घेतला. याचबरोबर त्याने मोठा विक्रम देखील केला. क्षेत्ररक्षण म्हणून विराट कोहली हा भारताकडून वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे.

Virat Kohli
IND vs AUS CWC23 : KL राहुलचा 'तो' षटकार अन् भारताची वर्ल्डकप 2023 मध्ये विजयी सुरुवात

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्षेत्ररक्षक

  • विराट कोहली - 15

  • अनिल कुंबळे - 14

  • कपिल देव - 12

  • सचिन तेंडुलकर - 12

भारत आणि ऑस्ट्रेलिया आजपासून आपली वर्ल्डकप मोहीम सुरू करत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला. सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूच्या आजारपणातून अजून सावरला नसल्याने तो सामन्याला मुकला.

यावेळी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, 'आम्ही आज सकाळपर्यंत त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होतो. मात्र तो सामना खेळण्याइतपत बरा झालेला नाही. त्यामुळे आम्ही त्याच्या ऐवजी संघात इशान किशनला संधी देत आहोत. इशान दिशन सलामीला फलंदाजी करेल.'

Virat Kohli
India Vs Australia : चेन्नईवर तब्बल 36 वर्षांनी होणार भारत - ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप सामना, कसं आहे चेपॉकचं रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची खेळपट्टी थोडी संथ आहे. त्यामुळे कांगारूंची सुरूवात संथ झाली. मार्श शुन्यावर बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाला 10 षटकात 43 धावांपर्यंत मजल मारून दिली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com