Ind vs Ban: तैजुल इस्लामचा बॉल फिरला अन् भारताची रन मशीन जागेवरच अडकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli India vs Bangladesh

Ind vs Ban: तैजुल इस्लामचा बॉल फिरला अन् भारताची रन मशीन जागेवरच अडकली

Virat Kohli India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. टीम इंडिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मात्र त्याची सुरुवात चांगली झाली नाही. 48 धावांवर भारताने 3 विकेट गमावल्या. संघाची तिसरी विकेट विराट कोहलीच्या रूपाने पडली. कोहलीच्या बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Lionel Messi : अंत जवळ आलाय... मेस्सी अर्जेंटिनाने फायनल गाठल्यावर काय म्हणाला?

भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान राहुल आणि शुभमन गिल संघासाठी सलामीला आले. गिल 20 आणि राहुल 22 धावा करून बाद झाला. यानंतर कोहली 5 चेंडूत केवळ 1 धावा काढून बाद झाला. इस्लामने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. कोहलीच्या बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यूजर्स त्यांना ट्रोलही करत आहेत.

हेही वाचा: IPL 2023 : रहाणे 50 लाख तर बेन स्टोक्स 2 कोटी...! लिलावात कोणत्या खेळाडूची मूळ किंमत किती?

कोहलीला कसोटी 2019 पासून एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याने आपले शेवटचे अर्धशतक जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले होते. कोहलीने या डावात 79 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने 7 कसोटी डाव खेळले मात्र त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. कोहलीने यापूर्वी जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. यामध्ये तो पहिल्या डावात 11 धावा आणि दुसऱ्या डावात 20 धावा करून बाद झाला. मात्र बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकावले.

टॅग्स :Virat kohli