Virat Kohli Golden Duck : 15 वर्षांच्या T20I कारकिर्दीत किंग कोहलीची पहिल्यांदाच लाजिरवाणी कामगिरी.... अफगाणी पठाणांनी उडवला 'गोल्डन डक'

Virat Kohli records 1st-ever golden duck in T20Is News :
Virat Kohli records 1st-ever golden duck in T20Is Marathi News
Virat Kohli records 1st-ever golden duck in T20Is Marathi Newssakal

Virat Kohli Golden Duck : टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पण भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. 4 वर्षांनंतर चिन्नास्वामीमध्ये T20I सामना खेळणारा विराट कोहलीही या सामन्यात फ्लॉप ठरला आहे. या सामन्यात विराटसोबत असे काही घडले जे त्याच्या कारकिर्दीत यापूर्वी कधीही घडले नव्हते.

Virat Kohli records 1st-ever golden duck in T20Is Marathi News
Hardik Pandya : हार्दिक पांड्याने दिले पुनरागमनाचे संकेत; शेअर केला नवीन व्हिडिओ; कोणाचा पत्ता होणार कट?

विराटच्या T20I करिअरमध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं

अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहली खातेही न उघडता बाद झाला. त्याच्या टी-20I कारकिर्दीतील ही 5वी वेळ आहे की त्याला खाते उघडण्यात अपयश आले. त्याच वेळी त्याच्या T20I कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे की तो गोल्डन डकवर बाद झाला आहे. म्हणजेच विराट कोहली त्याच्या टी-20 कारकिर्दीत पहिल्यांदाच पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.

विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, परंतु आज टी-20 मध्ये तो येथे काही खास खेळू शकला नाही. विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एकूण 6 T20I सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये विराटने 23.20 च्या सरासरीने केवळ 116 धावा केल्या आहेत. या काळात त्याला केवळ एकदाच 50 धावांचा टप्पा गाठता आला आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फेल ठरली. संजू सॅमसनची पुन्हा एकदा मोठी संधी हुकली आहे. या मालिकेत प्रथमच त्याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता, पण तोही गोल्डन डकवर बाद झाला. त्याचवेळी यशस्वी जैस्वाललाही विशेष काही करता आले नाही. तो 6 चेंडूत केवळ 4 धावांची खेळी करू शकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com