INDvsSA : कोहलीची मोठी घोषणा, पंत अंतिम संघात खेळणार नाही; साहाचे पुनरागमन

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठी घोषणा केली आहे. 

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठी घोषणा केली आहे. 

INDvsSA : आफ्रिकेच्या 'या' तीन खेळाडूंविरुद्ध टिकाल तरच मालिका जिंकाल

युवा यष्टीरक्षक रिषभ पंतची अखेर संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्याजागी वृद्धिमान साहाचे पुनरागमन झाले आहे. पहिल्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने साहाच यष्टीरक्षक म्हणून अंतिम संघात खेळणार असल्याचे स्पष्ट केले. 

साहाने 2010मध्ये कसोटी पदार्पण केले आहे. मात्र, धोनीच्या कसोटी निवृत्तीनंतर त्याला संघात स्थान मिळाले. त्याने 32 कसोटी सामन्यांच्या 46 डावांमध्ये 1164 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. 

INDvSA : मालिका विजयासह भारतीय संघ करणार हा खास विक्रम

पहिली लढत : 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम
दुसरी लढत : 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे 
तिसरी लढत : 19 ते 23 ऑक्टोबर - रांची  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli makes clear that Wriddhiman Saha will be part of Playing XI againt South Africa