Virat Kohli : ठरलं तर मग! विराट कोहली टी 20 मधूनच घेणार ब्रेक; आता IPL 2023...

India Squad SL Series Virat Kohli T20 Cricket Break
India Squad SL Series Virat Kohli T20 Cricket Breakesakal

India Squad SL Series Virat Kohli : बीसीसीआय आज (दि. 27) श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 आणि वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यापूर्वीच विराट कोहलीबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी आली असून विराट कोहली टी 20 क्रिकेटमधून ब्रेक घेणार आहे. तो आता वनडे आणि कसोटी क्रिकेटवर जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

India Squad SL Series Virat Kohli T20 Cricket Break
Nitish Rana Ranji Trophy : राणा तू आयपीएलच खेळ! केकेआरच्या खेळाडूला दिल्लीने रणजी संघातून दिला नारळ

बीसीसीआय आज श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशात होणाऱ्या टी 20 आणि वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करणार आहे. यापूर्वीच विराट कोहलीला विश्रांती देण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. मात्र आता विराट कोहलीच टी 20 क्रिकेटपासून काही काळ लांब राहणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. विराट कोहली शक्यतो आयपीएल 2023 पर्यंत भारताकडून टी 20 खेळणार नाहीये. याबाबत त्याने बीसीसीआयला अद्याप काही सांगितलेले नाही.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'होय विराट कोहलीने तो टी 20 साठी उपलब्ध असणार नाही असे कळवले आहे. तो श्रीलंकेविरूद्धची वनडे मालिका खेळले. त्याने टी 20 मधून ब्रेक घेतला आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र तो महत्वाच्या मालिकांसाठी प्लॅन करतोय. रोहितबाबत बोलायचं झालं तर आम्ही रोहितच्या दुखापतीबाबत घाई करणार नाही. त्यामुळे तो फिट आहे की नाही याबाबत आम्ही आताच काही ठरवणार नाही. तो फलंदाजी करतोय मात्र आम्हाला फिल्डिंगमध्ये कोणताही धोका पत्करायचा नाहीये.' (Sports Latest News)

India Squad SL Series Virat Kohli T20 Cricket Break
Rishabh Pant MS Dhoni : धोनी - पंतचे हितगुज! करिअर वाचवण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावरून थेट गाठले दुबई?

भारताचा 2024 च्या टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ तयार करताना विराट कोहलीचा हा ब्रेक निवडसमितीच्या पथ्यावर पडणारा आहे. सध्या भारतीय संघव्यवस्थापन टी 20 संघाची नव्याने बांधणी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे टी 20 संघातून रोहित शर्मासह अनेक वरिष्ठ खेळाडूंवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. निवडसमिती नव्या खेळाडूंना आजमावून पाहणार आहेत.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com