Virat Kohli : 1 धावावर जीवदान! किंग कोहलीने बांगलादेशात रचला इतिहास

विराट कोहलीने बांगलादेशात रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला
Virat Kohli
Virat Kohlisakal

Virat Kohli IND vs BAN 3rd ODI : बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मात्र यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहलीने असा पराक्रम केला जो याआधी कोणताही भारतीय खेळाडू करू शकला नाही.

Virat Kohli
Ishan Kishan : जिंकलास भावा! संधीचं सोनं करावं इशान किशनसारख, ठोकले पहिले शतक

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने आपल्या डावातील 16वी धावा काढताच इतिहास रचला आहे. बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीपूर्वी बांगलादेशमध्ये कोणताही भारतीय फलंदाज हा पराक्रम केला नव्हता. विराट कोहलीने 18 डावात 1000 धावांचा टप्पा पार केला. यादरम्यान त्याच्या बॅटने 5 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली.

Virat Kohli
IND vs BAN Test Squad: BCCI ने घेतला मोठा निर्णय! 12 वर्षांनंतर घातक गोलंदाजाची संघात एंट्री

या सामन्यात विराट कोहलीलाही 1 धावांच्या स्कोअरवर असताणा मोठे जीवदान मिळाले. बांगलादेशी संघाचा कर्णधार लिटन दासने 1 धावांवर शॉर्ट मिडविकेटचा झेल सोडला. ही घटना भारतीय संघाच्या डावाच्या 7 व्या षटकात घडली. विराट कोहलीच्या आधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने बांगलादेशमध्ये हा पराक्रम केला होता.

Virat Kohli
Lionel Messi Angry: मेस्सीला राग का आला! सामन्यानंतर नेदरलँडच्या कोचशी भिडला

उभय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या वनडेमध्ये केएल राहुल टीम इंडियाची कमान सांभाळत आहे. त्याचवेळी इशान किशनला प्लेइंग 11 मध्ये त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत इशान किशननेही शतक झळकावण्यात यश मिळविले. या मालिकेत तो प्रथमच प्लेइंग 11 चा भाग बनला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com