तीन वर्षांत माझ्यात झाला एवढा बदल; विराटने केला व्हिडिओ पोस्ट

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

भारताचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच अत्यंत जागरुक असतो. त्याच्यामुळे भारतीय संघातील इतर खेळाडूंनासुद्धा फिटनेसचे महत्त्व कळाले. विराट कोहलीने त्याच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचया फिटनेसमध्ये तीन वर्षांत झालेला बदल स्पष्ट दिसत आहे. 

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच अत्यंत जागरुक असतो. त्याच्यामुळे भारतीय संघातील इतर खेळाडूंनासुद्धा फिटनेसचे महत्त्व कळाले. विराट कोहलीने त्याच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचया फिटनेसमध्ये तीन वर्षांत झालेला बदल स्पष्ट दिसत आहे. 

टेकनिक परफेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे संयम असण्याची गरज आहे. हा व्यायाम मी गेली तीन वर्षे करत आहेत आणि त्यामुळेच मी यात आता पारंगत झालो असून आता माझी ताकदही वाढली आहे. त्यामुळेच नवीन काहीतरी शिकत असताना नेहमी संयम ठेवा,'' असे ट्विट त्याने केले आहे. 

या ट्विटमध्ये तो 2016 म्ध्ये एक व्यायाम करताना दिसत आहे तर शेजारीच 2019मध्ये तोच व्यायम करतानाचा व्हिडिओ आहे. 2016मध्ये जो व्यायाम करायला त्याला कष्ट घ्यावे लागत होते तोच व्यायम आता तो अगदी सहजपणे करताना दिसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli posts a video of his fitness on twitter