'विराट कोहलीला बीसीसीआयने साधे थँक यू देखील म्हटलं नाही'

विराट कोहलीला बीसीसीआयने साधे थँक यू देखील म्हटले नाही : अयाज मेमन
Virat Kohli Sourav Ganguly
Virat Kohli Sourav Gangulyesakal

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा टीम इंडियातील वाद काही केल्या थांबण्याची लक्षणे दिसत नाही. या वादात आता भारताचे माजी खेळाडू आणि क्रीडा समिक्षकांनीही उडी घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ज्यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील (India Tour Of South Africa) एकदिवसीय मालिकेपासून रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल अशी घोषणा केल्यानंतर या प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. (Virat Kohli Rohit Sharma rift Ayaz Meman Statement)

Virat Kohli Sourav Ganguly
कोणीही खेळापेक्षा मोठा नाही; विराट - रोहित वादावर क्रीडा मंत्री कडाडले

यानंतर विराट कोहली (Virat Kohli) सारख्या मोठ्या खेळाडूबाबत बीसीसीआयने (BCCI) ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्यावर उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. आता क्रिकेट समिक्षक अयाज मेमन (Ayaz Memon) यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत 'गेल्या 10 ते 15 दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या त्या भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठ्या आहेत. मात्र हा वाद का झाला? हे सगळं विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याऱ्या प्रसिद्धी पत्रकापासून सुरु झाले. त्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी फक्त एका वाक्यात विराटला कर्णधारपदावरुन हटवले.'

Virat Kohli Sourav Ganguly
अश्विनच्या टी २० वर्ल्डकपमधील समावेशाबाबत गांगुलीने केला मोठा खुलासा

अयाज मेमन पुढे म्हणाले की, 'विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला बरेच काही दिले. तुम्ही त्याला साधे थँक्यू देखील म्हणाला नाहीत. एवढ्या मोठ्या खेळाडूला कर्णधारपदावरून हटवताना तुम्हा फक्त एक प्रसिद्धी पत्रक काढता.' अयाज मेमन यांनी सांगितले की, सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) विराट कोहलीने स्वतः टी 20 चे कर्णधारपद सोडले असे सांगितले. जर विराट कोहली टी 20 चे नेतृत्व करणार असे म्हणाला असता तर रोहित शर्मा कर्णधार झाला असता का?'

दरम्यान, या सर्व प्रकरणावर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी चाहत्यांना सबुरीचा सल्ला दिला. त्यांनी जोपर्यंत हे दोन्ही खेळाडू आणि बीसीसीआय यावर कोणताही खुलासा करत नाही तोपर्यंत यावर तर्क वितर्क लढवले जाऊन नयेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com