भाई, एक और ले आओ! कोहलीला कडक रिप्लाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Viral Photo

भाई, एक और ले आओ! कोहलीला कडक रिप्लाय

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने सुपर संडेची एक खास पोस्ट शेअर केली आहे. कोहलीनं जो फोटो शेअर केलाय त्यात 10 जण ग्रे सूट घालून बसल्याचे दिसते. या सर्वांचा चेहरा हा विराट कोहलीशी मिळता जुळता आहे. अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या फोटोतील असली कोण नकली कोण? असा प्रश्न विराट कोहलीनं आपल्या चाहत्यांना केला आहे. कोहलीने शेअर केलेला फोटो पाहून चाहते चांगलेच गोंधळले आहेत. एका चाहत्याने यात मार्ग काढत भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. ‘ भाई, एक और लाते तो आरसीबी (RCB) की टीम पूरी हो जाती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एका युजर्सने हा एक बहु पर्यायी प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: IND VS WI : तिसऱ्या T20 मध्ये होणार अनेक रेकॉर्ड ब्रेक; कोण रचणार इतिहास?

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर किंग कोहलीनं ब्रेक घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेलाही तो उपलब्ध असणार नाही. कोहलीसह रिषभ पंतलाही बीसीसीआय (BCCI) ने ब्रेक दिला आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेसह पहिल्या टी-20 सामन्यात विराट कोहली नावाला साजेसा खेळ करु शकला नव्हता. दुसऱ्या टी-20 सामन्यात दमदार अर्धशतक ठोकून त्याने टिकाकारांना प्रत्युत्तर दिले. वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत त्याने केवल 26 धावा केल्या होत्या. पहिल्या टी 20 सामन्यात कोहली 17 धावांवर बाद झाला होता.

हेही वाचा: Ranji Trophy : यश धूलचा विक्रमी धुरळा!

विराट कोहली ब्रेकनंतर श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुन्हा कमबॅक करेल. मोहालीच्या मैदानात रंगणारा पहिला कसोटी सामना किंग कोहलीसाठी खास आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तो 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. या सामन्यात शतकी दुष्काळ संपण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना बंगळुरुच्या मैदानात नियोजित असून हा सामना दिवस रात्र पद्धतीने खेळवण्यात येणार आहे.

Web Title: Virat Kohli Shares Hilarious Image On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top