धोनीबद्दलचा निर्णय आता कोहलीनेच घ्यावा; माजी कर्णधाराचा सल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल तुफान चर्चा सुरु आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा निर्णय हा सर्वस्वी धोनीचा असावा असे मत व्यक्त केले आहे मात्र, भारताचा एक माजी कर्णधार मात्र, म्हणतोय की नाही विराट कोहलीचे आता धोनीच्या निवृत्तीचा निर्णय घ्यावा. कोम आहे बरं हा माजी कर्णधार?

नवी दिल्ली : सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल तुफान चर्चा सुरु आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा निर्णय हा सर्वस्वी धोनीचा असावा असे मत व्यक्त केले आहे मात्र, भारताचा एक माजी कर्णधार मात्र, म्हणतोय की नाही विराट कोहलीचे आता धोनीच्या निवृत्तीचा निर्णय घ्यावा. कोम आहे बरं हा माजी कर्णधार?

विश्वकरंडकानंतर धोनीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. तो सध्या सुरु असलेलया आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेसही उपलब्ध नव्हता. म्हणूनच आता त्याने त्याच्या निवृत्तीबाबत विचार करायला हवे अशी मागणी जोर धरु लागली आहे. मात्र, धोनीच्या निवृत्तीबाबतचा निर्णय कोहली आणि निवड समितीने घ्यावा असे मत सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. 

गांगुली म्हणाला, ''निवड समिती धोनीच्या निवृत्तीबद्दल काय विचार करते माहित नाही, विराटच्याही डोक्यात काय आहे हे माहित नाही मात्र, तेच या प्रक्रियेतील महत्वाचे घटक आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli should take decision about retirement of Dhoni says Sourav Ganguly