Virat Kohli: 'विराट नावाचा एलियन आला, त्यानं...' आजी- माजी पाकिस्तानी क्रिकेटर बोललेच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Virat Kohli: 'विराट नावाचा एलियन आला, त्यानं...' आजी- माजी पाकिस्तानी क्रिकेटर बोललेच!

Virat Kohli Viral News: विराटच्या विराट फलंदाजीची भुरळ आता जगभरातील क्रिकेटप्रेमींना पडली आहे. सध्याच्या घडीला सगळीकडून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. कालच्या सामन्यात विराटनं केलेली कामगिरी ही अनेकांच्या हदयात घर करून गेली आहे. विराटच्या आतापर्यतच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी होती असे अनेकांचे म्हणणे आहे. केवळ भारतीयच नाहीतर पाकिस्तानी चाहत्यांनी देखील विराटचं कौतूक केलं आहे.

यासगळ्यात आजी - माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी देखील विराटवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी त्याला त्याच्या आगामी करिअरसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मेलबर्नमध्ये झालेल्या त्या सामन्यानं अनेकांना मोठा आनंद दिला आहे. दिवाळींच अनोख गिफ्ट चाहत्यांना मिळालं आहे. विराटच्या खेळीचे सोशल मीडियावर वारेमाप कौतूक होतंय. त्यानं 53 चेंडूत 82 धावा काढून भारताच्या विजयाचा शिल्पकार होण्याचा मान मिळवला होता.

पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी विराटची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम म्हणाले की, मला तर कोहली हा एलियनच वाटला. तो आला त्यानं पाहिलं आणि ज्याप्रमाणे खेळ केलास त्यानं सर्वांना जिंकून घेतलं. विराटची ती खेळी ही वादळी होती. भारताच्या विजयात त्याचे योगदान महत्वाचे होते. त्यानं गेल्या 15 वर्षांपासून भारतीय संघासाठी खूप काही दिले आहे. मी पाहिलेला आतापर्यतचा सर्वोत्कृष्ट फलंदाज असे त्यांनी विराटचे कौतूक केले आहे.

याशिवाय पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज, वहाब रियाज, शोएब मलिक यांनी देखील कोहलीचे कौतूक केले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं कोहली आणि पांड्यानं सामन्याचा रंगच बदलून टाकला. भारताच्या त्या विजयाचे श्रेय कोहली आणि पांड्याला द्यावं लागेल.

हेही वाचा: Virat Kohli: 'आय लव यू विराट...फक्त तूच'! अनुष्काची कडक पोस्ट

हेही वाचा: Shrinidhi Shetty: 'तुझ्यावर नेहमीच होतं क्रश'