Virat Kohli Retirement : भारतीय क्रिकेटने (Indian Cricket) आतापर्यंत तीन सर्वकालीन महान बॅट्समन क्रिकेट जगताला दिले. सर्वप्रथम अर्थातच सुनील गावसकर ज्याने त्याकाळी डॉमिनंट असलेल्या टेस्ट क्रिकेट (Test Cricket) फॉरमॅट वर प्रभुत्व गाजविले. त्यावेळी वन डे क्रिकेट आजच्या इतके फोफावले नव्हते. त्यानंतर आला सचिन तेंडुलकर, त्याने टेस्ट्स आणि वन डे या तत्कालीन प्रचलित असलेल्या दोन्ही फॉरमॅट्स वर अधिराज्य केले. सचिनच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काही वर्षात टी २० क्रिकेटचा उदय झाला. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा तीनही फॉरमॅट्सचे क्रिकेट प्रचलित झाले होते.