Virat Kohli vs Shaheen Afridi : एकाकडे 275 वनडेचा अनुभव दुसऱ्याने खेळलेत फक्त 40 सामने... कोण कोणावर पडतंय भारी?

Virat Kohli vs Shaheen Afridi
Virat Kohli vs Shaheen Afridiesakal

Virat Kohli vs Shaheen Afridi : भारताची रन मशीन जवळपास तीन वर्षाच्या दुष्काळातून बाहेर आली आहे. आता विराच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीकडे 275 वनडे सामन्यांचा अनुभव आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदीने देखील आपल्या 40 सामन्यांच्या वनडे कारकिर्दीत चांगली कामगिरी करत जगात आपले नाव केले आहे.

आशिया कप 2023 मध्ये आज (2 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याकडे विराट कोहली विरूद्ध शाहीन शाह आफ्रिदी सामना असं देखील पाहिलं जात आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कोण कोणावर भारी पडतंय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Virat Kohli vs Shaheen Afridi
ODI World Cup 2023 : राहुल, सॅमसनबाबत होणार मोठा निर्णय, वर्ल्डकप संघाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला!

विराट कोहली

विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं तर विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्ध 48.72 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत पाकिस्तानविरूद्ध 13 वनडे सामने खेळले असून 536 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने या 13 सामन्यात दोन शतकी तर दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याने वनडे कारकिर्दीतील आपली सर्वोच्च धावसंध्या 183 धावा या देखील पाकिस्तानविरूद्धच केल्या आहेत. त्याने 2012 च्या आशिया कपमध्ये ही धमाकेदार खेळी केली होती.

आशिया कपचा विषय निघाला आहे तर विराटच्या आशिया कपमधील (वनडे) आकडेवारीवर देखील नजर टाकूयात. विराटने आतापर्यंत 10 डावात फलंदाजी केली आहे. त्यात त्याने 613 धावा ठोकल्या आहेत. आता 2023 च्या आशिया कपमध्ये देखील त्याच्याकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा आहे.

Virat Kohli vs Shaheen Afridi
Virat Kohli Haris Rauf : सगळीकडे कोहली... कोहलीच... हारिस रौऊफ अजूनही धक्क्यातून सावरला नाही?

शाहीनशाह आफ्रिदी

पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीबद्दल बोलायचं झालं तर त्याने या वर्षातील 8 वनडे सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 20.6 च्या सरासरीने आणि 5.04 ची इकॉनॉमी ठेवत ही कामगिरी केली आहे. 23 वर्षाच्या शाहीनने आपल्या गोलंदाजीची दहशत निर्माण केली आहे. तो कायम विराट कोहलीची महत्वाची विकेट घेण्याचा प्रयत्न करत असतो.

शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत 40 वनडे सामने खेळले आहेत. त्या त्याने 78 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. आशिया कपमध्ये देखील त्याचे रेकॉर्ड भारी आहे. त्याने 4 वनडे सामन्यात 25.66 च्या सरासरीने 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी देखील 5 च्या आतच आहे.

शाहीनने जरी दमदार कामगिरी केली असली तरी भारताविरूद्ध 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात त्याला विकेट घेता आली नव्हती. आज आशिया कपमधील भारताविरूद्धच्या महत्वाच्या सामन्यात शाहीनने महत्वाच्या विकेट्स घेऊन द्याव्यात अशी अपेक्षा असणार आहे.

Virat Kohli vs Shaheen Afridi
Asia Cup IND vs PAK Rain : कँडीवर घोंगावतंय वादळ! भारत - पाकिस्तान सामन्यावर पाणी फिरणार की...

विराट कोहली वनडे रेकॉर्ड

  • सामने - 275

  • डाव - 265

  • धावा - 12898

  • सर्वोकृष्ठ खेळी - 183

  • सरासरी - 57.32

  • स्ट्राईक रेट - 93.62

  • शतक - 46

  • अर्धशतक - 65

शाहीनशाह आफ्रिदी वनडे रेकॉर्ड

  • सामने - 40

  • डाव - 39

  • विकेट्स - 78

  • सर्वोकृष्ठ गोलंदाजी - 35 धावात 6 बळी

  • सरासरी - 23.08

  • इकॉनॉमी - 5.42

  • स्ट्राईक रेट - 25.5

  • 5 विकेट्स - 2 वेळा

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com