esakal | INDvsNZ : कोहलीची किवींना थेट धमकी; बघा काय म्हणाला

बोलून बातमी शोधा

Virat Kohli warns New Zealand team ahead of 1st test

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आमच्या समोर कोणीही आले तरी आम्ही त्याला घाबरत नाही असे विधान केले आहे. 

INDvsNZ : कोहलीची किवींना थेट धमकी; बघा काय म्हणाला
sakal_logo
By
सुनंदन लेले

वेलिंग्टन : भारताचा कर्णधार विराट कोहली आता शांत झाला आहे. त्याला खूप समज आली आहे आणि तो जास्त आक्रमक राहिलेला नाही अशा चर्चा सध्या क्रिकेटविश्वात सुरु आहेत. मात्र, असे असतानाच त्याने न्यूझीलंडच्या संघाला थेट धमकी दिली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आमच्या समोर कोणीही आले तरी आम्ही त्याला घाबरत नाही असे विधान केले आहे. 

INDvsNZ : हवा कुणाची रं? फक्त फास्टर्सची रं!

तो म्हणाला, ''आम्ही आमच्या खेळावर आणि तंदुरुस्तीवर एवढे काम केले आहे की आमच्या समोर कोणताही संघ आला तरीही आम्ही त्याला नमवू. आम्हाला तसा पूर्ण आत्मविश्वास आहे आणि या मालिकेत आम्ही त्याचप्रकारचा खेळ करणार आहोत.''

रोहित शर्माच्या दुखापतीनंतर भारतीय संघात कसोटी सामन्यासाठी सलामीला कोण येणार हा प्रश्न उपस्थित राहिला असताना आता कोहलीचे त्याचेे उ्तर दिले आहे. पृथ्वी शॉच सलामीवीर म्हणून खेळेल असे सांगताना तो म्हणाला, ''पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल हेच सलामीला येतील. मयांकने गेल्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहे. पृथ्वीबद्दल बोलायचं झालं तर मला त्याच्या गुणांची कल्पनना आहे. तो एका आक्रमक फलंदाज आहे आणि त्याचा नैसर्गिक खेळ करण्यासाटी त्याला संघ पूर्ण पाठिंबा देत आहे.''

INDvsNZ : बायको प्रेग्नंट म्हणून तो थांबला घरी; किवींनी बदली खेळाडू बघा कोण बोलावलाय

ईशांत शर्माच्या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, ''ईशांत शर्माला न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे आणि याचाच विचार करता तो भारतीय संघासाठी सर्नवांत मोलाचा खेळाडू आहे.'' 

संघाच्या योजनांबबात बोलताना कोहलीने स्पष्ट विचार व्यक्त केले. तो म्हणाला, ''किवींचा संघ खूपच दर्जेदार आहे आणि म्हणूनच आम्ही आखलेल्या योजनाच राबविणार आहे. कोणत्याही दिवशी आम्ही योजनांशिवाय उतरणारच नाही. ते जसा खेळ बदलतील तसे आम्ही आमच्या योजना राबवू.''

INDvsNZ : आम्ही कडवे आव्हान देणारच, कोई शक?

अजून तीन वर्षे मी पूर्ण फिट, पुढचं पुढं बघू
क्रिकेटच्या वाढत्या व्यस्त वेळापत्रकावर कोहली नाराजी नक्कीच व्यक्त केली मात्र, पुढची तीन वर्षे तरी पूर्ण फिट राहू शकतो असे सांगितले आहे. तो म्हणला, ''क्रिकेट खेळण्याचे प्रमाण वाढल्याने थकवा जाणवतो हे मान्य करावे लागेल. आम्ही एकाच वेळी विश्रांती घेऊ शकत नाही. मी स्वत: जाणीवपूर्वक क्रिकेटपासून लांब जातो. मला वाटते 3 वर्ष मी अजून असे व्यस्त वेळापत्रक असून तंदुरुस्त राहू शकतो मग पुढचे पुढे बघू.''

तिकडे सचिनचा बर्लिनमध्ये अवॉर्ड शो अन् इकडे दादाचा जळफळाट!

एवढं वारं की हातातली बॅटही हालते
''बेसीन रिझर्व्हला वार्‍याचा खूप परिणाम होतो. खास करून कर्णधार म्हणून मला गोलंदाजी चालू असताना वेगवेगळे विचार करावे लागतात. कोणता खेळाडू कुठे स्विंग करतो, कोणाला गोलंदाजी करताना वारा तोंडावर घेऊन मारा करणे आवडते आणि कोणाला वारा पाठीशी घेऊन ते मला लक्षात ठेवावे लागेल. आमचा वेगवान गोलंदाजांचा ताफा उत्साह वाढवणारा आहे.
फलंदाजी करताना कधीकधी वार्‍याने बॅट हातात हलू शकते याचाही मी अनुभव घेतला आहे,'' असेही कोहलीने सांगितले.