esakal | Ind vs Eng: कोहलीचा 'विराट' विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

कोहलीचा 'विराट' विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

sakal_logo
By
विराज भागवत

जेम्स अँडरसनला चौकार लगावून केला भीमपराक्रम

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने इंग्लंड दौऱ्यावर अद्याप दमदार खेळी करून दाखवलेली नाही. पहिल्या तीन कसोटी मालिकांमध्ये आणि सहा डावांमध्ये विराटने केवळ एक अर्धशतक झळकावले. विराटच्या खराब फॉर्मची तुलना त्याच्या २०१४मधील खराब कामगिरीशी केली जात आहे. चाहतेदेखील विराटवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. अशातच विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील (World Record) एक मैलाचा दगड (23000 International Runs) ओलांडला. महत्त्वाची बाब म्हणजे, क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यालाही त्याने मागे टाकले.

हेही वाचा: कोहलीबद्दल कसोटी मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बोलला रूट

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (११) आणि लोकेश राहुल (१२) झटपट बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली मैदानावर आला. इंग्लंडचा जेम्स अँडरसन गोलंदाजी करत असताना त्याला सणसणीत चौकार लगावत विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २३ हजार धावांचा टप्पा पार केला. डावातील १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराटने अँडरसनला दमदार चौकार खेचला आणि भीमपराक्रम केला. विराट हा २३ हजार धावांचा टप्पा सर्वात जलदगतीने गाठणारा फलंदाज ठरला. त्याने ४९० डावांमध्ये हा पल्ला गाठला तर सचिनला यासाठी ५२२ डाव खेळावे लागले होते. ५०० डावांपेक्षा कमी डावात २३ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विश्वविक्रम विराटने केला. याआधी कोणालाही ही कामगिरी करता आली नव्हती.

सर्वात जलद २३ हजार धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज (डावांच्या तुलनेत)

  • ४९० - विराट कोहली

  • ५२२ - सचिन तेंडुलकर

  • ५४४ - रिकी पॉन्टींग

  • ५५१ - जॅक कॅलीस

  • ५६८ - कुमार संगाकारा

  • ५७६ - राहुल द्रविड

  • ६४५ - महेला जयवर्धने

loading image
go to top