Virender Sehwag : निवडसमिती अध्यक्षपदाची ऑफर... काय म्हणाला विरेंद्र सेहवाग?

Virender Sehwag BCCI Chief Selector
Virender Sehwag BCCI Chief Selectoresakal

Virender Sehwag BCCI Chief Selector : बीसीसीआयने नुकतेच निवडसमिती सदस्य नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. यानंतर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग हा निवडसमिती अध्यक्ष होण्याबाबत चर्चा सुरू झाल्या. बीसीसीआयने निवडसमिती अध्यक्ष पदासाठी विरेंद्र सेहवागशी संपर्क साधला असल्याचे वृत्त आले होते. मात्र याबाबत आता खुद्द विरेंद्र सेहवागनेच प्रतिक्रिया दिली.

Virender Sehwag BCCI Chief Selector
PM Narendra Modi In USA : युएसए संघांचा चांगला प्रयत्न... क्रिकेटवरून नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये टोलेबाजी

विरेंद्र सेहवाग टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला की, बीसीसीआयने अशा प्रकारची कोणतीही ऑफर मला दिलेली नाही. बीसीसीआयची निवडसमिती गेल्या काही महिन्यापासून निवडसमिती अध्यक्षाविनाच आहे.

चेतन शर्मांना स्टिंग ऑपरेशनमुळे त्यांचा जॉब गमवावा लागला आहे. त्यांनी खेळाडू आणि संघ निवडीबाबतची गुप्त माहिती या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड केली होती.

तेव्हापासून भारताचा माजी खेळाडू शिव सुंदर दास हा अंतरिम निवडसमिती अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. समितीत सध्या एस शरथ, सुब्रोतो बॅनर्जी आणि सलिल अंकोला हे निवडसमिती सदस्य आहेत.

Virender Sehwag BCCI Chief Selector
Olympic Day 2023 : मॅरेथॉन चौकात उभारणार कविता राऊतचे पहिले शिल्प!

बीसीसीआने एका निवडसमिती सदस्यासाठी गुरूवारी नोटिफिकेशन जाहीर केले. या पदासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणार आहे.

उमेदवाराने किमान 7 कसोटी सामने किंवा 30 प्रथम श्रेणी सामने् किंवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळणे गरजेचे आहे. याचबरोबर अर्जदार उमेदवार हा निवृत्त होऊन जवळपास पाच वर्षे उलटून गेलेली असावी. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून आहे.

सध्या भारतीय संघ सक्रमणातून जात आहे. त्यामुळे नव्या निवडसमिती सदस्याला बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यासाठी योजना आखता आली पाहिजे. तसेच प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार नियुक्त करता आला पाहिजे. अशी अपेक्षा बीसीसीआय करत आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com