Virender Sehwag : यांना हलवून जागं करायला हवं... विरेंद्र सेहवागच्या टीम इंडियाला कानपिचक्या

Virender Sehwag Take a Dig on India bad form
Virender Sehwag Take a Dig on India bad formesakal

Virender Sehwag Take a Dig on India bad form : भारताचा टी 20 वर्ल्डकपमध्ये सेमी फायनल सामन्यात पराभव झाल्यानंतर संघावर बरीच टीका झाली होती. आता वर्षभरात मायदेशात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये तरी भारतीय संघ आपल्याला निराश करणार नाही अशी आशा चाहते बाळगून होते. मात्र या भाबड्या आशेला पहिल्याच वनडे मालिकेत तडे गेले. बांगलादेशने तीन सामन्यामच्या मालिकेतील दोन सामने जिंकून मालिका खिशात घालती. दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने 6 बाद 69 धावांवरून 50 षटकात 7 बाद 271 धावांपर्यंत मजल मारली. मेहदी हसन मिराझने नाबाद शतकी खेळी केली. भारताचा संघ 50 षटकात 266 धावाच करू शकला. भारताने दुसऱ्या सामन्यासह मालिका देखील गमावली. बांगलादेशविरूद्धची मालिका गमावल्यानंतर आता टीम इंडियावर टीका होत आहे. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने भारताच्या ढासळणाऱ्या कामगिरीवरून चिमटा काढला.

Virender Sehwag Take a Dig on India bad form
Kuldeep Sen : लागलं ग्रहण! केवळ एकच सामना खेळून कुलदीप सेन संघातून बाहेर

विरेंद्र सेहवागने ट्विट केले की, 'क्रिप्टो करन्सीपेक्षाही जास्त वेगाने आपली कामगिरी ढासळ आहे मित्रांनो. खडबडून जागं होण्याची गरज आहे.' असे ट्विट केले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुखापग्रस्त रोहित शर्माने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत तुफान फटकेबाजी करत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. भारताला विजयासाठी एका चेंडूवर 6 धावांची गरज असताना रोहितला षटकार मारण्यात अपयश आले. विशेष म्हणजे मोहम्मद सिराजला 48 व्या षटकात एकही धाव करता आली नाही. हे षटक निर्धाव गेल्याने सामन्याच्या निकालावर मोठा परिणाम झाला. भारताची अवस्था 4 बाद 65 धावा अशी झाली असताना श्रेयस अय्यर (82) आणि अक्षर पटेल (56) यांनी 107 धावांची भागीदारी रचत संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते.

Virender Sehwag Take a Dig on India bad form
IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध पाठोपाठ ठोकली दोन शतके! आता रोहितची जागा घेण्यासाठी सज्ज

बांगलादेशने पहिल्यांदाच भारताविरूद्धची वनडे मालिका जिंकलेली नाही. 2015 मध्ये देखील त्यांनी मायदेशात मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वात धोनीच्या नेतृत्वातील संघाला मात दिली होती. मात्र यंदाचा मालिका पराभव हा फार गंभीर आहे कारण भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी 12 महिन्यांपेक्षाही कमी वेळ शिल्लक राहिला आहे.

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com