
नवी दिल्ली : महाराष्ट्राची युवा खेळाडू दिव्या देशमुख हिने विश्वकरंडकाचे अजिंक्यपद पटकावताना कौतुकास्पद खेळ केला. यानंतर दिव्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरामधून कौतुक करण्यात आले. याप्रसंगी भारताचे माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांच्याकडूनही तिला पोचपावती मिळाली. दिव्याने अंतिम फेरीत दाखवलेल्या धैर्याची त्यांच्याकडून स्तुती करण्यात आली.