Team India : BCCI चा मोठा निर्णय; बुमराह होणार टीम इंडियाचा कर्णधार, कोचही बदलणार पण...

vvs laxman coach of team india | Jasprit Bumrah maybe Captain
vvs laxman coach of team india | Jasprit Bumrah maybe Captain

Team India : भारतीय क्रिकेट संघ या वर्षी ऑगस्टमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन्ही देशांदरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. याशिवाय भारतीय पुरुष क्रिकेट संघ आणि महिला संघ या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये सहभागी होणार आहेत.

BCCI ने जाहीर केले आहे की आशियाई क्रीडा खेळ 2023 मध्ये भारताचा दुय्यम पुरुष संघ असेल मुख्य महिला संघ सहभागी होईल. व्हीव्हीएस लक्ष्मण आता राहुल द्रविडच्या जागी आयर्लंड दौऱ्यासाठी आणि त्यानंतर आशियाई खेळ 2023 साठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात.

vvs laxman coach of team india | Jasprit Bumrah maybe Captain
Team India: 'रोहित-कोहली अजूनही...' सौरव गांगुली BCCI च्या निवडी समितीवर भडकले

व्हीव्हीएस लक्ष्मण हे अनेक वेळा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाले आहेत, पुन्हा एकदा आयर्लंड दौऱ्यावर त्यांची टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते. स्पोर्ट्स स्टारच्या मते, भारताचा दुसरा स्ट्रिंग संघ या दौऱ्यावर जाणार आहे, ज्यामध्ये एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करणारे मुख्य खेळाडू नाहीत.

हार्दिक पांड्याला देखील आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते आणि जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तेथे तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळू शकते असे वृत्त आहे. आयर्लंड दौऱ्यावर रिंकू सिंगसह अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाऊ शकते.

vvs laxman coach of team india | Jasprit Bumrah maybe Captain
Team India : रोहित, विराट अन् पांड्या 'या' मोठ्या स्पर्धेतून बाहेर, BCCIने दिले संकेत

त्याच वेळी भारतीय पुरुष संघ आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये देखील सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी संघाची कमान शिखर धवनकडे सोपवली जाऊ शकते, जो एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असणार नाही. लक्ष्मण हे या संघाचे मुख्य प्रशिक्षकही होऊ शकतात. आशियाई स्पर्धामध्ये खेळवली जाणारी क्रिकेट स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये असेल आणि यामध्येही भारतीय संघाचा द्वितीय श्रेणीचा संघ पाठवला जाईल.

आयर्लंड दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाला तिथल्या यजमानांविरुद्ध तीन टी-20 सामने खेळायचे आहेत, ज्याचा पहिला सामना 18 ऑगस्टला, दुसरा सामना 20 ऑगस्टला आणि मालिकेतील शेवटचा सामना म्हणजेच तिसरा सामना 23 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू या दोन्ही दौऱ्यांमध्ये सहभागी होणार नाहीत कारण ते 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com