मी ज्या चूका केल्या, त्या तू करु नकोस; लक्ष्मणचा रोहितला भावनिक सल्ला

VVS Laxman suggests Rohit Sharma to not change his batting technique
VVS Laxman suggests Rohit Sharma to not change his batting technique

नवी दिल्ली : कसोटीमध्ये सलामीला खेळायला सांगितल्यावर स्वत:च्या मूळ तंत्रात आणि खेळण्याच्या शैलीत बदल करुन चालणार नाही. यामुळेच कामगिरीवर वाईट परिणाम होतो, असे सांगत भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने रोहित शर्माला त्याच्या नैसर्गिक खेळात बदल न करता तसेच खेळण्याचा सल्ला दिला आहे. 

''रोहितचा अनुभव ही त्याची खूप मोठी जमेची बाजू आहे. जेव्हा मला सलामीवीर म्हणून खेळायला पाठवलं तेव्हा मी केवळ चार सामने खेळलो होतो. रोहित गेली 12 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि तो सध्या तुफान फॉर्मातही आहे,'' असे मत त्याने व्यक्त केले.  

रोहितने त्याची शैली बदलू नये असा सल्ला देताना तो म्हणाला, ''मी माझी खेळण्याची स्टाईल बदलण्याचा प्रयत्न केला. मधल्या फळीत खेळताना मी जसा खेळायचो त्याच्या अगदी उलटं मी सलामीवीर म्हणून खेळलो आणि म्हणूनच अपयशी ठरलो. खेळण्याच्या शैलीतच बदल केल्याने मला मोठा फटाक बसला. म्हणूनच रोहितने असं अजिबात करुन नये.''

लक्ष्मण 1996-1998मध्ये सलामीवीर म्हणून खेळला खरा मात्र, त्याला सलामीवीर म्हणून पूर्णपणे अपयश आले. मात्र मधल्या फळीत त्याने तुफान कामगिरी करत 134 कसोटींमध्ये 8781 धावा केल्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com