

Sports News
sakal
नवी दिल्ली : जागतिक द्रव्यविरोधी संस्थेचे (वाडा) प्रमुख विटोल्ड बांका यांनी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष संचालक मनोज शशीधर यांची भेट घेतली. या बैठकीत डोपिंगविरोधी कारवाई अधिक मजबूत करण्यासाठी आणि यामागील गुन्हेगारी जाळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाली.