Wasim Akram : दिग्गज क्रिकेटर्सचा मोठा खुलासा; ड्रग्जनं उद्ध्वस्त केलं 'आयुष्य', नंतर पत्नीचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wasim Akram Drug Addiction

Wasim Akram : दिग्गज क्रिकेटर्सचा मोठा खुलासा; ड्रग्जनं उद्ध्वस्त केलं 'आयुष्य', नंतर पत्नीचा...

Wasim Akram Drug Addiction : पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित अनेक कथांमध्ये मॅच फिक्सिंग, वयाच्या कागदपत्रांशी छेडछाड यासारख्या वाईट गोष्टींचा समावेश होता. अनेकवेळा या खेळावरही डाग लागला. आता या देशाच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक आणि माजी कर्णधाराने आपल्या आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 56 वर्षीय वसीम अक्रमने सांगितले की, त्याला एकेकाळी ड्रग्जचे व्यसन लागले होते. एवढेच नाही तर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली होती पण एका अपघाताने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

हेही वाचा: Ind Vs Sa : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या प्लेइंग-11 मधून KL राहुलला डच्चू?

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने आत्मचरित्रात अनेक गुपिते उघड केली आहेत. एका खुलाशाने त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण क्रिकेट समुदायाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका रिपोर्टनुसार, अक्रमने 'सुलतान ए मेमरी' या आत्मचरित्रात कोकेन आणि ड्रग्जच्या व्यसनाचा खुलासा केला आहे. त्याला एकेकाळी ड्रग्जचे व्यसन होते. या पुस्तकात त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.

हेही वाचा: Pak vs Ned : ताकही फुंकून पिण्याची पाकिस्तानवर वेळ, दुबळ्या संघाविरुद्ध शेवटची संधी

अक्रमने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, त्याने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये एका पार्टीदरम्यान कोकेनचे सेवन केले होते. अंमली पदार्थांच्या व्यसनाने अक्रमवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याच्या कारकिर्दीसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही याचा परिणाम होत होता. अक्रमने कबूल केले की एका क्षणी त्याला वाटू लागले की ड्रग्स घेतल्याशिवाय आपण जगू शकत नाही.

एका अपघाताने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकल्याचे अक्रमने पुस्तकात सांगितले आहे. अक्रमने लिहिले की, पहिली पत्नी हुमाच्या मृत्यूने सर्व काही बदलले. यानंतर त्याने ठरवले की तो पुन्हा कधीही कोकेन घेणार नाही. त्यांनी लिहिलं आहे की, जेव्हा मी पार्ट्यांमध्ये राहायचो तेव्हा हुमा एकटीच असायची. तिला इंग्लंडहून कराचीला जायचे होते जेणेकरून ती तिच्या आई-वडिलांपासून दूर राहू शकेल पण मला ते नको होते.

अक्रम निवृत्तीनंतर आता कॉमेंट्री करतो. पाकिस्तानच्या महान गोलंदाजांमध्ये त्याच्या नावाचा समावेश होतो. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 916 विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1042 विकेट आहेत.