PAK vs AFG: '8 किलो मटण खाता तरी फिटनेस...' बाबरच्या संघावर संतापला पाकिस्तानी दिग्गज

Wasim Akram Angry Babar Azam Pakistan Team
Wasim Akram Angry Babar Azam Pakistan Team

Wasim Akram Angry Babar Azam Pakistan Team : वर्ल्ड कपच्या 22 व्या सामन्यात अफगाणिस्तानने वाईट रित्या पाकिस्तानचा पराभव केला. अफगाणिस्तान संघाने हा सामना 8 विकेटने जिंकला. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सलग तिसरा धक्का बसला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

या स्पर्धेत आतापर्यंत पाकिस्तानचे फिल्डिंग अत्यंत खराब राहिले आहे. पाकिस्तान संघाने 5 सामन्यात बरेच झेल सोडले. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ए स्पोर्ट्सवर कार्यक्रमात वसीम अक्रम म्हणाले की, “आजचा दिवस खरोखरच वाईट होता. अफगाणिस्तानने 280 धावांपर्यंत मजल मारली, तीही केवळ 2 गडी गमावून. ही खूप मोठी गोष्ट आहे. पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण पहा. गेल्या 3 आठवड्यांपासून असे दिसते आहे की हे खेळाडू 2 वर्षांपासून फिटनेस चाचणीसाठी गेले नाहीत. मी त्यांची नावे घ्यायला सुरुवात केली तर नाराज होतील. हे खेळाडू दररोज 8 किलो मटण खात आहेत. तरी पण फिटनेस चांगली नाही.

वसीम अक्रमने पुढे म्हणाला की, 'पहा सर्व खेळाडूंना देशासाठी खेळण्यासाठी मोबदला मिळत आहे. मिसबाह-उल-हक प्रशिक्षक असताना त्याला कोणी पसंत केले नाही. त्याचे फिटनेसचे निकष अधिक चांगले होते. ज्याने मैदानावर काम केले आहे. क्षेत्ररक्षणासाठी तंदुरुस्ती असणे अत्यंत आवश्यक आहे.

सध्याच्या वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तान संघाने सर्वात वाईट क्षेत्ररक्षण केले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने अनेक झेल सोडले, अनावश्यक धावा दिल्या आणि रन आऊटच्या संधीही गमावल्या आहेत. त्याची कामगिरी अशीच राहिली असती तर त्याला टॉप 4 मध्ये पोहोचणे कठीण होईल. आता पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com