
KL Rahul Wasim Jaffar : जाफरचं वक्तव्य केएल राहुलच्या फार जिव्हारी लागणारं; म्हणाला...
Wasim Jaffar KL Rahul : बांगलादेशविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत काळजीवाहू कर्णधार केएल राहुलची फलंदाज म्हणून अत्यंत सुमार कामगिरी झाली आहे. दुसरीकडे युवा सलामीवीर शुभमन गिलने दमदार फलंदाजी करत कसोटी संघातील आपली दावेदारी अजून मजबूत केली. आता भारताचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार रोहित शर्मा संघात परतल्यानंतर सलामी जोडीला कोणाला खेळवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने आपले रोखठोक मत व्यक्त केले.
हेही वाचा: Team India BCCI : रोहित, राहुल अन् विराटचे भविष्य ठरवणाऱ्या 'रिव्ह्यू' बैठकीबाबत BCCI अधिकाऱ्याने दिली मोठी अपडेट
भारताचा काळजीवाहू कर्णधार केएल राहुलने बांगलादेश दौऱ्यावरील दोन कसोटीमधील चार डावात अनुक्रमे 22, 23, 10 आणि 2 धावा केल्या. त्याची दोन कसोटी सामन्यातील सरासरी ही 17.13 इतकी सुमार होती. या कामगिरीनंतर भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरच्या मते ऑस्ट्रेलियावरूद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुलला कसोटीच्या प्लेईंग 11 मधून वगळण्यात येण्याची शक्यता आहे.
वसिम जाफर इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला की, 'माझ्या मते केएल राहुलला वगळण्यात येईल याबाबत कोणती शंका नाही. एक फलंदाज म्हणून बांगलादेश मालिकेत त्याने अत्यंत सुमार कामगिरी केली आहे. जर रोहित शर्मा संघात परतला तर केएल राहुलला त्याच्यासाठी जागा करून द्यावी लागले.'
वसिम जाफरने केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्या 145 धावांसारखे छोटे टार्गेट चेस करताना बचावात्मक फलंदाजी करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जाफर म्हणाला की वरच्या फळीने बांगलादेशच्या फिरकीपटूंना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली.
हेही वाचा: Team India: बघतोयस काय रागानं मागं टाकलंय अश्विननं; फलंदाजीत विराटवर पडला भारी
जर श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी 71 धावांची भागीदारी रचली नसती तर बांगलादेशने भारताविरूद्धचा पहिला कसोटी विजय साजरा केला असता. अश्विनने 62 चेंडूत 42 तर श्रेयस अय्यरने 46 चेंडूत 29 धावांची नाबाद खेळी करत बांगलादेशचे 145 धावांचे आव्हान पार केले.