व्हेगन कर्णधार 'बिर्याणी' निवडणार नाही का : जाफरचा सवाल

वासिम जाफरच्या 'या' विचित्र ट्विटमुळे सगळेच गोंधळले
Wasim Jaffer Vegan Virat Kohli
Wasim Jaffer Vegan Virat Kohliesakal

भारताचा माजी फलंदाज वासिम जाफर (Wasim Jaffer) आपल्या क्रिकेटबद्दलच्या ज्ञानासाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे तो आपल्या कोड्यात टाकणाऱ्या (Cryptic Tweet) सोशल मीडिया पोस्टसाठीही प्रसिद्ध आहे. वासिम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉगन यांच्यातील सोशल मीडिया वॉर देखील कायम सुरु असते. आता भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होण्यापूर्वी वासिम जाफरने संघनिवडीच्या पर्यायांबद्दल एक भन्नाट (Cryptic Tweet) ट्विट केले. या ट्विटमुळे सर्वजण गोधळले आहेत.

भारताचा माजी फलंदाज वासिम जाफरने (Wasim Jaffer) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन पार्कवरील पहिल्या कसोटीपूर्वी संघ निवडीबाबत एक ट्विट केले. या पोस्टमध्ये त्याने पावभाजी, नीर डोसा आणि बिर्यानी या तीन खाद्यप्रकारांचा फोटो शेअर केला. यावर त्याने ' या तीनमधील दोन डिश निवडायच्या आहेत तुम्ही काय निवडाल? आणि हो जर निवड करणारा व्यक्ती व्हेगन असेल तर बिर्याणीला निवडले जाणार नाही का.. विचार करायला काही खाद्यपदार्थ.#SAvIND' असे कॅप्शन दिले.

Wasim Jaffer Vegan Virat Kohli
कुलदीपची प्रशंसा अश्विनला टोचली याचा मला आनंदच : शास्त्री

वासिम जाफरचे हे ट्विट भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली जो व्हेगन आहे (Vegan Virat Kohli) त्याच्या बाबतीत आहे. विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (SA vs IND) पहिल्या कसोटी सामन्यासाठी मधल्या फळीत कोणाला खेळवायचे याची निवड करायची आहे. मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावर कोण खेळवायचे हा यक्ष प्रश्न विराट कोहली समोर असणार आहे.

या जागेसाठी न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण केलेल्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) धडाकेबाज शतक ठोकून आपली दावेदारी सादर केली आहे. तर दुसऱ्या बाजूला हनुमा विहारी (Hanuma Vihari) देखील या जागेवर आपला हक्क सांगत आहे. या दोघांची स्पर्धा ही भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) दक्षिण आफ्रिकेतील अनुभवाबरोबर असणार आहे.

Wasim Jaffer Vegan Virat Kohli
सट्टेबाजी कायदेशीर करा, शास्त्रींची मोदी सरकारकडे मागणी

हेच मधल्या फळीतील फंलदाज निवडीबाबतचे ऑप्शन वासिम जाफरने खाद्यपदार्थांच्या कोड्यात सादर केले. पाव भाजी (Pav Bhaji) ही मुंबईच्या अजिंक्य रहाणेसाठी वापरण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यरने लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीला नीर डोसा (Neer Dosa) पाठवला होता. याचा संदर्भ घेत श्रेयस अय्यरसाठी नीर डोसा ही डिश वापरण्यात आली आहे. तर हनुमा विहारी हा हैदराबादचा असल्याने जाफने हैदराबादी बिर्याणीचा (Biryani) वापर केला.

वासिम जाफरने (Wasim Jaffer) हुशारीने या डिशेसचा वापर करत पाचव्या क्रमांकासाठी कोण कोण स्पर्धेत आहे हे दर्शवले. त्याच्या कॅप्शनचा अर्थ फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर आणि विदेशात धावा करण्यात माहिर असलेल्या अजिंक्य रहाणेच्या तुलनेत हनुमा विहारीला संघात संधी मिळेल याची शक्यता कमी आहे असा होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com