बुमराहला कर्णधार केल्याने जाफर नाराज; 95 कसोटी खेळणाऱ्याला सोडून...

Wasim Jaffer Not Happy With The Decision To Make Jasprit Bumrah Captain Instead Of Cheteshwar Pujara
Wasim Jaffer Not Happy With The Decision To Make Jasprit Bumrah Captain Instead Of Cheteshwar Pujara esakal

ENG vs IND 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीला भारताचा कर्णधार रोहित शर्मा कोरोनाची लागण झाल्यामुळे मुकला. निवडसमितीने त्याच्या जागी या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah) भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. 1987 नंतर पहिल्यांदाच एका वेगवान गोलंदाजाला कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व (Team India Captain) करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर (Wasim Jaffer) या निर्णयावर नाराज आहे. जाफर जे म्हणतोय त्याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही.

Wasim Jaffer Not Happy With The Decision To Make Jasprit Bumrah Captain Instead Of Cheteshwar Pujara
ENG vs IND Live : सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबला

वसिम जाफरने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की, या कसोटीसाठी चेतेश्वर पुजाराला संघाचा कर्णधार करणे गरजेचे होते. चेतेश्वर पुजाराला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करण्याचा चांगला अनुभव आहे. तो चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतो. सौराष्ट्राच्या या खेळाडूने भारताकडून जवळपास 95 कसोटी सामने खेळले आहेत. हे त्याला कर्णधार करण्यासाठी भरपूर आहे.

जाफर म्हणाला की, त्याने चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना पाहिले आहे. तो एक चांगला कर्णधार आहे. त्याने 90 आसपास कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे या सामन्यासाठी पुजाराला कर्णधार करणे हा योग्य निर्णय असता.

Wasim Jaffer Not Happy With The Decision To Make Jasprit Bumrah Captain Instead Of Cheteshwar Pujara
VIDEO : कर्णधार जसप्रीत बुमराहला आईने पहिल्या कसोटीसाठी दिल्या टिप्स

जाफर म्हणाला की गेल्या वेळी जसप्रीत बुमराह उप कर्णधार होता. त्यामुळे त्याला कर्णधार करणे स्वाभाविक गोष्ट होती. मात्र सामना आणि मालिकेचे महत्व लक्षात घेता. कोणताही अनुभव नसलेल्या खेळाडूला कर्णधारपद देणे म्हणजे अनिश्चितता. जसप्रीत बुमराह हुशार वाटतो. त्याला खेळ चांगल्या प्रकारे समजतो देखील तो देखील हार्दिक पांड्या सारखे आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com