Rahul Dravid : नागपूर... पाऊस... अन् सासूरवाडीवरून जाफरने राहुल द्रविडला काढला चिमटा

पावसामुळे सामन्याला उशीर झाल्यामुळे जाफरने द्रविडला केले ट्रोल
wasim jaffer trolls coach rahul dravid
wasim jaffer trolls coach rahul dravid

Wasim Jaffer Trolls Coach Rahul Dravid : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ओल्या मैदानामुळे नाणेफेक दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाली. यादरम्यान मैदानावरील कामगार विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या काही भागाची दुरुस्ती करण्यात गुंतले होते. दरम्यान भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने प्रशिक्षक राहुल द्रविडबद्दल एक मजेशीर ट्विट केले आहे.

पावसामुळे सामन्याला उशीर झाल्यामुळे जाफरने द्रविडला ट्रोल केले. जाफरने ट्विट करून लिहिले की, जेव्हा तुम्ही ठराविक वयानंतर सासरच्या जागी जाता तेव्हा गोष्टी वेळेवर सुरू होतातच असे नाही. यासोबतच त्याने हसणारे इमोजी बनवले असून आहे. द्रविडची पत्नी विजेता हिचा जन्म नागपुरात झाला आहे. निवृत्तीनंतर विजेताचे वडील कुटुंबासह नागपुरात स्थायिक झाले.

wasim jaffer trolls coach rahul dravid
Video : केवळ 2 बॉल खेळणारा कार्तिकचं मॅचविनर; पंत का आला नाही रोहितचा खुलासा
wasim jaffer trolls coach rahul dravid
Dinesh Karthik : 2 बाॅलमध्येच संपवली मॅच; परफेक्ट फिनिशर म्हणाला, मी कोणतंही श्रेय...

पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने आठ षटकांत 5 गडी गमावून 90 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने 20 चेंडूत 43 तर कर्णधार फिंचने 15 चेंडूत 31 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियाचे 91 धावांचे आव्हान 7.2 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रोहित शर्माने 20 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूवर एक षटकार एक चौकार मारत सामना संपवला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com