wasim jaffer trolls eoin morgan jason roy netherlands vs england cricket
wasim jaffer trolls eoin morgan jason roy netherlands vs england cricket

नेदरलँडला लोळवणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधाराला जाफरने का केले ट्रोल?

एबी डिव्हिलियर्सचा विश्वविक्रम मोडण्यासाठी जोस बटलरचा फक्त एक चेंडू चुकला

Netherlands vs England : इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका सुरु आहे. पहिला सामना अ‍ॅमस्टेलवीन येथील VRA क्रिकेट मैदानावर खेळल्या गेला. इंग्लंडने या सामन्यात 4 गडी गमावून 498 धावा करून एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला आहे. इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात तीन फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ होती. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील असा दुसरा संघ बनला आहे. (wasim jaffer trolls eoin morgan jason roy netherlands vs england cricket)

इंग्लंडसाठी जोस बटलर , फिल सॉल्ट आणि डेविड मलान यांनी शतक ठोकले. लियाम लिव्हिंगस्टोननेही 22 चेंडूत 66 धावांची आक्रमक खेळी खेळले, यांच्या जोरावर एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकात 498 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 49.4 षटकांत 266 धावांत गारद झाला. इंग्लंडने हा सामना 232 धावांनी जिंकला.

इंग्लंडच्या विजयानंतर भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने इंग्लंडचा कर्णधार ओईन मॉर्गन आणि जेसन रॉयला ट्रोल केले आहे. सात चेंडूंत रॉयला फक्त एकच धाव करता आली, तर मॉर्गन गोल्डन डकवर बाद झाला. वसीम जाफरने बॉलीवूडच्या सुपरहिट '3 इडियट्स' एक मजेदार मीम त्याने शेअर केला आहे, आणि या जोडीला ट्विटरवर ट्रोल करत आहे. अनेकदा जाफर सोशल मीडियावर असे मीम्स पोस्ट करत असतो. तो चाहत्यांमध्ये 'मिम किंग' म्हणून प्रसिद्ध आहे.

जोस बटलरने नेदरलँड्सविरुद्ध 70 चेंडूत नाबाद 162 धावा केल्या. या वेळी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 150 धावांचा विक्रम करण्यासाठी तो फक्त एक चेंडू चुकला. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने 64 चेंडूत हा पराक्रम केला, तर बटलरने 65 चेंडू केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com