Liz Truss : पंतप्रधानांचा 45 दिवसात राजीनामा; जाफरने इंग्लंडला काढला चिमटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wasim Jaffer Tweeted hilarious jokes Over UK prime minister Liz Truss Resignation

Liz Truss : पंतप्रधानांचा 45 दिवसात राजीनामा; जाफरने इंग्लंडला काढला चिमटा

Wasim Jaffer Tweet On Liz Truss : भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर हा ट्विटवरून प्रतिस्पर्ध्यांना चिमटे काढण्यात तरबेज आहे. वसिम जाफरचे जवळपास प्रत्येक ट्विट हे हटके आणि लक्ष वेधून घेणारे असते. त्यामुळेच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा असते. आता या वसिम जाफरने आज ट्विटवर नवा कारनामा केला आहे. वसिम जाफरने इंग्लंडच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसात राजीनामा दिल्याचे औचित्य साधून ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप खेळण्यासाठी गेलेल्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला चिमटे काढले आहेत.

हेही वाचा: India Vs Pakistan : पाकिस्तानला धक्का! फलंदाज शान मसूदच्या डोक्यावर आदळला बॉल

वसिम जाफरने ट्विट केले की, 'आम्ही वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या संघांचे मुल्यमापन केले. त्यात...

भारतीय संघाकडे 150 किमी प्रतीतास वेगाने चेंडू टाकणारा गोलंदाज नाही.

पाकिस्तानकडे मॅच फिनिशर नाही.

न्यूझीलंडचे ऑस्ट्रेलियात चांगले रेकॉर्ड नाही.

श्रीलंकेकडे अनुभवी संघ नाही.

इंग्लंडच्या संघाकडे त्यांचा पंतप्रधान नाही.'

हेही वाचा: Nicholas Pooran : पात्रता फेरीतच गाशा गुंडळावा लागल्यानंतर कर्णधार पूरन म्हणतो...

इंग्लंडच्या 47 वर्षाच्या पंतप्रधान ट्रस यांनी पंतप्रधान म्हणून फक्त 45 दिवस काम केले. त्या ब्रिटीश इतिहासातील सर्वात कमी काळ पंतप्रधान राहिलेल्या व्यक्ती ठरल्या. इंग्लंडचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 7 जुलैला राजीनामा दिल्यानंतर हुजूर पक्षाने पंतप्रधानपदासाठी निवडणूक घेतली. त्यात लिझ ट्रस आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यात थेट लढत झाली. या लढतीचा निकाल जवळपास दोन महिन्यांनी 5 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर ट्रस यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. आता त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून पक्ष नवा नेता निवडेपर्यंत त्या पदावर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील.